Railway Line ला बॉम्बने उडवले, मोठ्या कटाची शक्यता

रेल्वे रुळावरून घसरण्याच्या घटनांमध्ये वाढ

205
Railway Line ला बॉम्बने उडवले, मोठ्या कटाची शक्यता
Railway Line ला बॉम्बने उडवले, मोठ्या कटाची शक्यता

देशभरात रेल्वे ट्रॅकवरून (Railway Line ) रेल्वे घसरण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे या घटनांमागे कट रचल्याची शक्यता वर्तवल्या जातात. अशाच प्रकारची एक घटना कानपुरमध्ये घडली आहे. यामध्ये रेल्वे ट्रॅकवर आग विझवणारा सिलिंडर आढळला. तर झारखंडमध्ये (Jharkhand) साहिबगंज येथे रेल्वे ट्रॅकला (Railway Line )बॉम्बने (bomb) उडवले आहे. या घटनांचा तपास सुरु आहे.

(हेही वाचा : Love Jihad रोखण्यासाठी आणि उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी गरब्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश द्या; हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

कर्नाटकात ट्रॅकवर आढळले अग्निशमन यंत्र

पहिले प्रकरण उत्तर प्रदेशच्या कानपुर देहात जिल्ह्यातील आहे. दि. २ ऑक्टोबर रोजी एक मालगाडी सकाळी ७ वाजता अम्बियापुरजवळून जात होती. तेव्हाच लोको पायलटला हावडा- दिल्ली डाऊनलाईनवर (Howrah-Delhi Downline) एक अग्निशमन यंत्र आढळले. मालगाडीच्या पायलटने ट्रेन थांबवून कंट्रोल रुमला सूचना दिली. जीआरपी आणि आरपीएफचे पथक लगेच घटनास्थळी दाखल झाले.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन यंत्र खुप जुने होते. त्यावरील स्टीकर ही काढण्यात आले होते. सुरुवातीला पोलिसांनी याला खोडसाळपणा असल्याचे सांगितले. मात्र ट्रेन डायव्हरने सतर्कता दाखवत गाडी थांबवत अग्निशमन यंत्र हटवले.

बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी ३ फुटाचा खड्डा

दुसरे प्रकरण झारखंडच्या (Jharkhand) साहिबगंज येथील आहे. दि. १ ऑक्टोबर आणि दि. २ ऑक्टोबर रोजी रात्री अज्ञातांनी एनटीपीसी एमजीआर रेल्वे ट्रॅकला (Railway Line ) बॉम्बने उडवून दिले. ही जागा बरहेट पोलिस ठाणे हद्दीतील आहे. तरी या बॉम्ब हल्ल्याने रेल्वे ट्रॅकवरचा (Railway Line ) ४७० सेंटीमीटरचा भाग ३९ मीटर दूर जाऊन पडला. तसेच बॉम्बस्फोट (bomb)झालेल्या ठिकाणी ३ फुट मोठा खड्डा पडला आहे. दरम्यान ट्रॅकच्या दुरूस्ती सुरु असून वाहतुक सेवा बंद आहे.

हेही पाहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.