कर्नाटकात (Karnataka Crime) आईच्या प्रेमावर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. एका आईने स्वतःच्या मुलाला नदीत फेकून दिले आहे. दांडेली तालुक्यातील एका २६ वर्षीय महिलेने तिच्या पतीसोबत झालेल्या जोरदार वादानंतर आपल्या सहा वर्षाच्या दिव्यांग मुलाला नदीत फेकून दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या जोडप्याला दोन वर्षांचा मुलगाही आहे. (Karnataka Crime)
(हेही वाचा –Akola News: काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून ७ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू)
मोठ्या मुलाच्या प्रकृतीवरुन पती-पत्नीत वारंवार वाद सुरु होते. जन्मापासुन मुलाला बोलता येत नव्हते. आरोपी आई सावित्रीचा २७ वर्षीय पती रवी कुमार आपल्या मोठ्या मुलाच्या अपंगत्वावरुन अनेकदा तिच्याशी भांडत असे. मिळालेल्या माहितीनुसार, तिने अशा मुलाला का जन्म दिला? मुलाला फेकून दे अशी वक्तव्ये पती करत असे. (Karnataka Crime)
(हेही वाचा –Jharkhand ED Raids: झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई! नोटांचं घबाड बघून अधिकारीसुद्धा चक्रावले)
याच मुद्द्यावरुन सावित्रीचे पतीसोबत पुन्हा भांडण झाले. त्यामुळे तिने आपल्या मुलाला नदीत फेकून दिले. शेजाऱ्यांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तात्काळ पेलिसांना माहिती दिली. अंधार असल्यामुळे मुलाचा शोध घेता आला नाही. रविवारी (५ मे) सकाळी मुलाचा मृतदेह सापडला. त्याच्या अंगावर गंभीर जखमा, चाव्याच्या खुणा आणि एक हात गायब होता. यावरुन मगरीने मुलाची शिकार केल्याचे दिसुन आले. याप्रकरणी पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे. (Karnataka Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community