Karnataka IPS Officer : पहिल्या पोस्टिंगनंतर पदभार स्वीकारण्यासाठी जात असतानाच IPS अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

104
Karnataka IPS Officer : पहिल्या पोस्टिंगनंतर पदभार स्वीकारण्यासाठी जात असतानाच IPS अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
Karnataka IPS Officer : पहिल्या पोस्टिंगनंतर पदभार स्वीकारण्यासाठी जात असतानाच IPS अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

कर्नाटकच्या (Karnataka) हासनमध्ये पहिल्याच पोस्टिंगवर जात असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा (Karnataka IPS Officer) अपघाती मृत्यू झाला आहे. हर्षवर्धन हे कर्नाटक कॅडर २०२३ चे अधिकारी होते. ट्रेनिंगनंतर त्यांना पहिलीच पोस्टिंग मिळाली होती. यामुळे ते रविवारी पोस्टिंगच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कारने निघाले होते. यावेळी कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. (Karnataka IPS Officer)

हेही वाचा- Blocked URLs : केंद्र सरकारने ब्लॉक केले २८ हजार URL; नेमकं कारण काय ?

टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरावर व झाडावर आदळले. अपघातात हर्षवर्धन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Karnataka IPS Officer)

हेही वाचा- Cyclone Fengal: ‘फेंगल’मुळे जनजीवन विस्कळीत; वादळाचा जोर ओसरला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन यांनी नुकतेच म्हैसूर येथील पोलीस अकादमीमध्ये चार आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्याने ते सोमवारी होलेनरसीपूर येथे प्रोबेशनरी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार होते. (Karnataka IPS Officer)

हेही वाचा- Mahakal Temple: महाकाल मंदिरात आता ATM सारख्या मशीनमधून लाडू प्रसाद मिळणार; पेमेंट कसे होणार?

हसनचे पोलीस अधीक्षक मोहम्मद सुजीत (Mohammed Sujeet) आणि सहायक पोलीस अधीक्षक व्यंकटेश नायडू (Venkatesh Naidu) यांनीही हॉस्पिटलला भेट देऊन हर्षवर्धन यांना श्रद्धांजली वाहिली आणि घटनेची माहिती घेतली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी हर्षवर्धन यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. (Karnataka IPS Officer)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.