आठ वर्षांपूर्वी १४ जणांच्या हत्याकांडाने हादरलेले ठाण्यातील कासारवडवली गाव गुरुवारी पुन्हा एकदा हादरले. कासारवडवली गावातील साईनगर परिसरात एका महिलेसह तिच्या चिमुकल्या दोन मुलाची हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडानंतर या महिलेचा पती बेपत्ता असून त्यानेच हे हत्याकांड केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी संशयित म्हणून मृत महिलेच्या पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. (Triple Murder)
भावना अमित बागडी (२४), अंकुश बागडी (८)आणि खुशी (६) असे हत्या करण्यात आलेल्या पत्नी आणि मुलांची नावे असून आरोपी अमित धर्मवीर बागडी (२९) हा आरोपी आहे. अमित बागडी हा मूळचा हरियाणा राज्यात राहणारा आहे. अमितचा सख्खा भाऊ विकास हा ठाण्यातील कासारवडवली गावातील साईंनगर येथे राहण्यास आहे. अमित याला दारूचे भयंकर व्यसन असल्यामुळे व्यसनाला कंटाळून भावना ही दोन्ही मुलांसह पतीला सोडून हरियाणा येथून ठाण्यात लहान दीर विकास सोबत राहत होती. (Triple Murder)
(हेही वाचा – Ram lala Pran pratishtha : श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेबाबत जगभरातील हिंदुंमध्ये उत्साह)
मागील तीन दिवसांपूर्वी अमित हा मुलांना आणि पत्नीला भेटण्यासाठी ठाण्यात भावाकडे आला होता. अमितचा लहान भाऊ विकास हा गुरुवारी सकाळी ७ वाजता कामावर निघून गेला होता, त्यानंतर सकाळीच साडेअकरा वाजता विकास घरी परतला असता घरातील दृश्य बघून तो हादरला त्याची भावजयी भावना आणि तिचे दोन्ही मुले रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, त्यांच्या शेजारीच रक्ताने माखलेली बॅट पडली होती, व घरात मोठा भाऊ अमित हा कुठेच दिसत नव्हता. हे दृश्य बघून विकासने शेजाराऱ्यांना गोळा केले. दरम्यान कोणीतरी या हत्याकांडाची माहिती कासार वडवली पोलिसांना दिली. कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय येथे पाठवीण्यात आला. (Triple Murder)
(हेही वाचा – China Bans iPhone : चीनने खरंच आयफोनवर बंदी आणली आहे का? )
आरोपीचा शोध सुरू…
या हत्याकांडाप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी फरार झालेल्या अमित बागडी याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके तयार करून त्याच्या मागावर पाठविण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे हत्याकांड कौटुंबिक वादातून झाले असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Triple Murder)
२०१६ मध्ये घडलेले हत्याकांड…
ठाण्यातील घोडबंदर रोडवर असलेल्या कासारवडवली गावात २०१६ मध्ये एकाच कुटुंबातील १४ जणांची क्रूरपणे हत्या करून हस्नील अन्वर वरेकर याने आत्महत्या केली होती. या हत्याकांडमध्ये कुटुंबातील एकमेव व्यक्ती हस्नील याची बहीण सुबिया जोसेफ भरमल ही वाचली होती. (Triple Murder)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community