Kerala Blasts : केरळ हादरले; यहोवा प्रार्थना चालू असतांना 3 स्फोट… 1 ठार, 20 जखमी

केरळच्या एर्नाकुलम येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या स्फोटांनी केरळ हादरले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, स्फोटाच्या वेळी ज्यू प्रार्थना सुरू होती. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला, तर 36 जण जखमी झाले. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली आणि राज्यातील परिस्थितीवर चर्चा केली. 

192
Kerala Blasts : केरळ हादरले; यहोवा प्रार्थना चालू असतांना 3 स्फोट... 1 ठार, 20 जखमी
Kerala Blasts : केरळ हादरले; यहोवा प्रार्थना चालू असतांना 3 स्फोट... 1 ठार, 20 जखमी

केरळच्या एर्नाकुलम येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या स्फोटांनी केरळ हादरले आहे. (Kerala Blasts) प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, स्फोटाच्या वेळी ज्यू प्रार्थना सुरू होती. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला, तर 36 जण जखमी झाले. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली आणि राज्यातील परिस्थितीवर चर्चा केली.  मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. आम्ही घटनेचा तपशील गोळा करत आहोत. सर्व वरिष्ठ अधिकारी एर्नाकुलममध्ये उपस्थित आहेत. पोलिस महासंचालकांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. आम्ही हे खूप गांभीर्याने घेत आहोत. मी  पोलिस महासंचालकांशी बोललो आहे. चौकशीनंतर आम्हाला अधिक माहिती मिळेल. एकाचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविस्तर माहिती मिळाल्यानंतरच मी बोलणार आहे.’ (Kerala Blasts)

या स्फोटाच्या प्रकरणी एनआयएकडून तपास करण्यात येणार आहे. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये यहोवाच्या साक्षीदारांची प्रार्थनासभा आयोजित केली होती.  या तीन दिवसीय कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस होता. ही प्रार्थनासभा चालू असतांनाच स्फोट झाला. या वेळी हॉलमध्ये 2,000 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते.  स्फोटात जखमी झालेल्या 20 हून अधिक लोकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जळालेला मृतदेह ताब्यात घेतला असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सभागृहातून पळून जात असताना काहीजण जखमी झाले. या सर्वांवर उपचार चालू आहेत. (Kerala Blasts)

यहोवाचे साक्षीदार म्हणजे काय ?

यहोवाचे साक्षीदार (Jehovah’s Witnesses) हा ख्रिश्चन धर्माचा एक पंथ आहे. त्यांच्या धार्मिक श्रद्धा मुख्य प्रवाहातील ख्रिस्ती धर्मापेक्षा वेगळ्या आहेत. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यहोवाच्या साक्षीदारांची तत्त्वे त्यांच्या नियामक मंडळाद्वारे निश्चित केली जातात.

शनिवारी केरळमधील मलप्पुरम येथे हमासच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. हमासचा माजी प्रमुख खालिद मिशेल यांनीही या सभेत भाषण केले होते आणि आज एर्नाकुलमच्या कलामस्सेरी भागातील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोट झाला. स्फोटामागचा हेतू काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एकापेक्षा जास्त स्फोटाचा आवाज ऐकू आला. एनआयए आणि आयबीची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.  (Kerala Blasts)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.