Kerala Drugs Case: केरळमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस; बालवाडीतील मुले ड्रग्जच्या विळख्यात!

61

राज्यासह देशभरात मागील अनेक दिवसांपासून अमली पदार्थांच्या घटनाक्रमांमध्ये वाढ होत आहे. देशभरात अमली पदार्थाचे रॅकेट कार्यरत असल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. यामध्ये सेलिब्रिटींसह युवा वर्गही अमली पदार्थांच्या (Drug) आहारी जात असल्याचे भीषण वास्तव आहे. केरळमध्ये तर किंडरगार्डन अर्थात बालवाडीतील मुलांपर्यंत ड्रग्जचा पुरवठा (Kerla Supply Drug to kindergarten children) केला जात असल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे.

प्रतिग्रॅम 25 हजारांवर किंमत
महाविद्यालयीन युवा वर्गासह किशोरवयीन मुलेही अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत आहेत. ड्रग्जच्या किमती प्रतिग्रॅम  25 हजारांवर आहेत. पहिल्या टप्प्यात नशेचे व्यसन लावले जाते. एकदा नशेचे व्यसन जडल्यानंतर अचानक पुरवठा खंडित केला जातो.

पैशांची चणचण
अमली पदार्थाच्या आहारी गेलेले विद्यार्थी पैशाची चणचण जाणवू लागल्यास ड्रग्जच्या रॅकेटमध्ये सामील होतात. आलिशान हॉटेल्स आणि पबमधून दलालांना ड्रग्जचा पुरवठा केला जातो. तसेच लहान बालकांनाही कॅम्पसमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी आमिष दाखविले जाते. उत्तर आणि पूर्व भारतातून बहुतांश अमली पदार्थांचा पुरवठा केला जातो.

(हेही वाचा – Navi Mumbai: 300 किलो एकल वापर प्लास्टिकचा साठा जप्त)

अजाणतेपोटी सेवन
यातील काही मुलांनी अजाणतेपोटी अमली पदार्थाचे सेवन केले. 200 विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती केंद्रात ठेवण्यात आले होते. त्यापैकी 70 टक्के विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीपासूनच अमली पदार्थांचे व्यसन लागल्याचे तपासणीतून पुढे आले आहे. लहान मुलांच्या लघवीच्या नमुन्यातून त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले.

समुपदेशनाची गरज
पालक, शिक्षक आणि पोलिसांनी समन्वयाने ड्रग्जच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्यांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. केरळमधील कोचीमध्ये एका शाळेत किशोरवयीन मुले अमली पदार्थांची नशा करीत होते. बालवाडातील मुलांसमोरच हा प्रकार सुरू होता.

कोणते ड्रग्ज घातक
हेरॉईन (Heroin), ओपीआईडस्, कोकेन, एमडीएमए, मेथामफिटॅमाईन, मेथ, बेंझोडियाझेपाईन्स आदी अमली पदार्थांचे व्यसन (Drug addiction) लागल्यास व्यसन सोडणे आव्हानात्मक ठरते. त्यामुळे समुपदेशन (counselling) आणि योग्यवेळी वैद्यकीय उपचार हाच अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा उपाय मानला जातो.

(हेही वाचा – Protest : बिल्डरकडून होणाऱ्या त्रासविरोधात कारवाई न केल्याने महापालिका के पूर्व विभाग कार्यालयाबाहेर भाजपाचे आंदोलन)

530 विद्यार्थ्यांवर उपचार
केरळमध्ये (Kerala) 530 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये 18 ते 22 वयोगटातील मुलांचाही समावेश आहे. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच व्यसन लागल्याचे पुढे आले आहे. यामध्ये 36 बालकांचाही समावेश होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.