खलिस्तान समर्थकांनी कॅनडातील (Canada) ब्रॅम्प्टनमध्ये हिंदू सभा मंदिरावर हल्ला केला असून तेथील लोकांना मारहाण केली आहे. हल्लेखोरांच्या हातात खलिस्तानी झेंडे होते. त्यांनी मंदिरात उपस्थित लोकांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेचा कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी निषेध केला आहे. या संपूर्ण घटनेवर जस्टिन ट्रुडो यांनी अधिकृत निवेदन जारी केले आहे.
काय म्हणाले ट्रूडो?
ब्रॅम्प्टन (Brampton) हिंदू मंदिरावरील हल्ला आणि तेथील लोकांना झालेल्या मारहाणीबाबत कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ब्रॅम्प्टनमधील हिंदू सभा मंदिरात झालेल्या हिंसाचाराच्या घटना अस्वीकार्य असल्याचे सांगितले आहे. ट्रूडो म्हणाले की, कॅनडातील (Canada) प्रत्येक व्यक्तीला मुक्तपणे आणि सुरक्षितपणे त्यांच्या विश्वासाचे पालन करण्याचा अधिकार आहे. जस्टिन ट्रूडो यांनी पुढे पील प्रादेशिक पोलिसांचे समुदायाचे रक्षण केल्याबद्दल आणि या घटनेच्या तपासाला त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानले.
खलिस्तानी समर्थकांमुळे हिंदू आणि भारतीय चिंतेत
काही काळापासून कॅनडातील हिंदू मंदिरे आणि समुदायातील सदस्यांना लक्ष्य केल्याने भारतीय समुदाय चिंतेत आहे. गेल्या काही वर्षांत ग्रेटर टोरंटो एरिया, ब्रिटिश कोलंबिया आणि कॅनडात इतरत्र हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. (Canada)
भारतीय दूतावास काय म्हणाले?
कॅनडाची राजधानी ओटावा येथील भारतीय दूतावासानेही या संपूर्ण घटनेवर निवेदन दिले आहे.दूतावासाने सांगितले की, आम्ही ब्रॅम्प्टन येथील हिंदू सभा मंदिराच्या सह-आयोजित कॉन्सुलर कॅम्पच्या बाहेर भारतविरोधी घटकांनी केलेल्या हिंसक घटना पाहिल्या आहे. दूतावासाने म्हटले आहे की आमच्या वाणिज्य दूतावासांद्वारे स्थानिक सह-आयोजकांच्या पूर्ण सहकार्याने आयोजित केल्या जाणाऱ्या नियमित वाणिज्य दूतावासाच्या कार्यांमध्ये अशा प्रकारचा व्यत्यय पाहणे अत्यंत निराशाजनक आहे. भारतीय नागरिकांसह अर्जदारांच्या सुरक्षेबाबतही आम्हाला खूप काळजी असल्याचे दूतावासाने म्हटले आहे. (Canada)
This morning in Brampton Ontario Canadain sikh Terrorist attacking Hindu worshipers outside a Hindu temple.
Hindus are not safe in Canada pic.twitter.com/VRfLaaZgAI
— THE BRITISH (@thebritish__) November 4, 2024
कॅनडाच्या संसदेत भारतीय वंशाचे खासदार चंद्र आचार्य यांनी म्हटले की, खलिस्तानी अतिरेक्यांनी सीमा ओलांडली आहे, हे कॅनडातील निर्लज्ज हिंसक अतिरेक्यांच्या उदयाचे प्रतिबिंब आहे. खलिस्तानींनी मंदिरातील भाविकांवर केलेला हल्ला कॅनडामध्ये किती खोलवर अतिरेकी झाला आहे हे दिसून येते. खासदार म्हणाले की, खलिस्तानी अतिरेक्यांना भाषण स्वातंत्र्याखाली मोकळा हात मिळाला आहे. हिंदू-कॅनेडियन लोकांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यांना त्यांच्या नेत्यांवर दबाव आणावा लागेल. (Canada)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community