Khalistani Pannu: भारतात परत जा; दहशतवादी पन्नूची कॅनडातील हिंदू खासदाराला धमकी

189
Khalistani Pannu: भारतात परत जा; दहशतवादी पन्नूची कॅनडातील हिंदू खासदाराला धमकी
Khalistani Pannu: भारतात परत जा; दहशतवादी पन्नूची कॅनडातील हिंदू खासदाराला धमकी

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने कॅनडातील हिंदू नेत्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्याने एक व्हिडीओ जारी करून कॅनडामधील भारतीय वंशाचे हिंदू खासदार चंद्र आर्य (Hindu MP Chandra Arya) यांना धमकी दिली आहे. आर्य यांनी कॅनडा (Canada) सोडून मायदेशी निघून जावे असा इशारा दिला आहे. चंद्र आर्य हे हिंदू कॅनडियन खासदार असून कॅनडातील खलिस्तानी लोकांद्वारे सुरू असलेल्या मंदिरांची विटंबना आणि इतर हिंसक कृत्यांविरोधात आवाज उठवत आहेत. (Khalistani Pannu)

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू (Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannu) याने एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओत त्याने म्हटलं आहे की “चंद्र आर्य आणि त्यांच्या समर्थकांसाठी कॅनडामध्ये जागा नाही. त्यांनी मायदेशी परत जावं. चंद्र आर्य कॅनडात भारताचा अजेंडा राबवत आहेत, भारत सरकारचा प्रचार करत आहेत. त्यांनी कॅनडाचं नागरिकत्व सोडून भारतात परत जावं. चंद्र आर्य आणि त्यांचे समर्थक खलिस्तान समर्थकांविरोधात काम करत आहेत. कॅनडात राहणाऱ्या खलिस्तानी शिखांनी त्यांची कॅनडाप्रती असलेली देशभक्ती सिद्ध केली आहे. आम्ही कॅनडाप्रती निष्ठावंत आहोत.” (Khalistani Pannu)

(हेही वाचा – Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक महामार्गावर बांधकाम साहित्य हटवा: मुख्यमंत्र्यांचे निर्देश)

चंद्र आर्य हे कॅनडामधील हिंदू खासदार आहेत. ते सातत्याने कॅनडातील खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात आवाज उठवत आहेत. कॅनडाच्या संसदेपासून इतर राजकीय आणि सामाजिक व्यासपीठांवरून ते खलिस्तानी दहशतवादाविरोधात बोलत आहेत, भारताविरोधात चालू असलेल्या दहशतवादी कारवायांवर बोलत आहेत. चंद्र आर्य हे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या लिबरल पार्टीचे खासदार आहेत.

प्रत्युत्तर म्हणून चंद्र आर्य यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, “एडमंटनमधील BAPS स्वामीनारायण मंदिराची तोडफोड आणि कॅनडातील खलिस्तान समर्थकांकडून द्वेष आणि हिंसाचाराच्या इतर कृत्यांचा माझ्या निषेधाला प्रतिसाद म्हणून, सीख फॉर जस्टीसचे गुरपतवंत सिंग पन्नू यांनी मला आणि माझ्या हिंदू-कॅनेडियन मित्रांना भारतात परत जाण्यास सांगितले आहे. आम्ही हिंदू जगाच्या कानाकोपऱ्यातून कॅनडामध्ये आलो आहोत. दक्षिण आशियातील प्रत्येक देशातून, आफ्रिका आणि कॅरिबियनमधील अनेक देश आणि जगातील इतर अनेक भागांतून आपण इथे आलो आहोत आणि कॅनडा ही आपली भूमी आहे. कॅनडाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी आम्ही खूप सकारात्मक आणि उत्पादक योगदान दिले आहे. आमची जमीन खलिस्तानी अतिरेक्यांनी प्रदूषित केली आहे आणि आमच्या कॅनेडियन सनदी अधिकारांनी दिलेल्या आमच्या स्वातंत्र्याचा गैरवापर करत आहेत.” (Khalistani Pannu)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.