महाकुंभमेळ्यात स्फोटाची जबाबदारी Khalistani Terrorist ने स्वीकारली 

पिलीभीत बनावट चकमकीत आमच्या 3 भावांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी खालसा तुमच्या अगदी जवळ आहे. ही तर सुरुवात आहे, असेही या संघटनेने ई-मेलमध्ये म्हटले आहे. या ई-मेलमध्ये फतेह सिंग बागीचे नाव लिहिले आहे.

334

प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात झालेल्या सिलिंडर स्फोटाच्या घटनेची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) या दहशतवादी संघटनेने (Khalistani Terrorist) स्वीकारली आहे. या संघटनेने यासंबंधी ई-मेल काही प्रसार माध्यमांना पाठवला आहे, ज्यामध्ये हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचे म्हटले आहे. हा स्फोट म्हणजे मुख्यमंत्री योगींना दिलेला इशाराच आहे. ही सुरुवात आहे, असेही म्हटल्याचे ‘दिव्य मराठी’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध वृत्तात म्हटले आहे.

कुंभमेळ्यादरम्यान झालेल्या दुहेरी स्फोटाची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स (Khalistani Terrorist) घेते. कोणाचेही नुकसान करणे हा त्याचा मुख्य उद्देश नव्हता. जोगी (उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) आणि त्यांच्या कुत्र्यासाठी हा फक्त इशारा होता. पिलीभीत बनावट चकमकीत आमच्या 3 भावांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी खालसा तुमच्या अगदी जवळ आहे. ही तर सुरुवात आहे, असेही या संघटनेने ई-मेलमध्ये म्हटले आहे. या ई-मेलमध्ये फतेह सिंग बागीचे नाव लिहिले आहे.

(हेही वाचा PM Narendra Modi ५ फेब्रुवारीला करणार महाकुंभात अमृत स्नान)

शास्त्री पुलाजवळील सेक्टर-19 येथील गीता प्रेसच्या कॅम्पमध्ये रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास दोन सिलिंडरच्या स्फोटामुळे आग लागली. यामुळे 180 तंबू जळून खाक झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता प्रेसच्या किचनमध्ये छोट्या सिलिंडरमधून चहा बनवत असताना सिलिंडर लीक होऊन आग लागली. यानंतर 2 सिलिंडरचा स्फोट झाला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या पाठवण्यात आल्या, त्यांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यावेळी अधिकाऱ्यांनी ही आगीची घटना असल्याचे म्हटले होते. 23 डिसेंबरला उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये पोलिसांनी तीन दहशतवाद्यांचा (Khalistani Terrorist) खात्मा केला होता. पंजाबमधील पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ल्यातील आरोपी पिलीभीतला पळून गेला होता. पंजाब पोलिसांनी पिलीभीत पोलिसांना हे आरोपी जिल्ह्यात लपून बसल्याची माहिती दिली होती, त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी आणि तपासणी मोहीम सुरू केली. यावेळी आरोपींनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला, पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले. जसनप्रीत सिंग, गुरविंदर सिंग आणि वीरेंद्र सिंग अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन एके-47 रायफल आणि दोन विदेशी पिस्तूलही जप्त केल्या.ही चकमक बनावट होती असा आरोप करत त्याचा बदला घेण्यासाठी कुंभमेळयात अग्नि तांडव घडवल्याचे या इमेलवरून लक्षात येते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.