खलिस्तानी दहशतवाद्यांनी दिल्लीतील लाल किल्ला आणि संसद भवन (Parliament News) बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. सीपीआयएमचे खासदार व्ही शिवदासन यांना हा धमकीचा फोन आला. याप्रकरणी खा. शिवदासन यांनी राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र पाठवले आहे.
भारतीय राज्यकर्त्यांचे डोळे उघडणे हा यामागचा उद्देश
केरळमधील सीपीआय(एम) खासदार व्ही. शिवदासन (V Shivdasan) यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे की, मला शिख फॉर जस्टिसच्या नावाने धमकीचा फोन आला होता. ही धमकी 21 जुलै रोजी रात्री 11.30 वाजता मिळाली. जेव्हा मला कॉल आला तेव्हा मी दिल्ली विमानतळ लाउंजमध्ये होतो आणि माझ्यासोबत खासदार ए रहीम थी होते. शीख फॉर जस्टिस खलिस्तानी सार्वमताचा संदेश देऊन भारतीय संसद भवन आणि लाल किल्ला परिसरात बॉम्बस्फोट करणार आहे. शिखांचे अस्तित्व धोक्यात असल्याने भारतीय राज्यकर्त्यांचे डोळे उघडणे हा यामागचा उद्देश आहे. खलिस्तानी जनमताचा अनुभव घ्यायचा नसेल तर घरीच रहा, असे फोनवर सांगितल्याचे व्ही शिवदासन म्हणाले. (Parliament News)
(हेही वाचा –Chennai Egmore एवढे लोकप्रिय का आहे?)
हा संदेश शिख फॉर जस्टिसचे जनरल काउंसिल गुरपतवंत सिंग पन्नू याच्या नावावर असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. व्ही शिवदासन यांनी या प्रकरणाची माहिती नवी दिल्लीच्या पोलिस उपायुक्तांना दिली आणि तक्रार दाखल केली आहे. त्यांनीही या प्रकरणाची दखल घेत पुढील कारवाईची विनंती केली आहे. (Parliament News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community