कोरोना काळात झालेल्या खिचडी घोटाळ्याचा (Khichdi Scam) तपास करणाऱ्या मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना (उबाठा) गटाचे नेते संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत (Sandeep Raut) यांचा नुकताच जबाब नोंदवला आहे. आपल्या जबाबात संदीप राऊत (Sandeep Raut) यांनी त्यांच्या खात्यात जमा झालेली ८ लाख रुपयांची रक्कम सह्याद्री रिफ्रेशमेंटच्या खात्यातून आली आहे, ती रक्कम ३०० चौरस फूट जागेच्या भाड्याची रक्कम असल्याचा दावा संदीप राऊत (Sandeep Raut) यांनी केला आहे. मात्र संदीप राऊत यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे एका अधिकारी यांनी म्हटले आहे. (Khichdi Scam)
कोरोनाच्या काळात मुंबई महानगरपालिकेकडून मजुरांना वाटप करण्यात आलेल्या खिचडी वाटपात घोटाळा (Khichdi Scam) झाल्याचे समोर आल्यानंतर या घोटाळ्याचा तपास मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासात घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात वैष्णवी किचन/सह्याद्री रिफ्रेशमेंटमध्ये सुनील उर्फ बाळा कदम यांना खिचडी बनवण्याचे कंत्राट देण्यात आले होते, परंतु त्यांच्याकडे ५००० हून अधिक लोकांसाठी खिचडी बनवण्यासाठी स्वयंपाकघर उपलब्ध नव्हते असे नमूद केले आहे. मनपाच्या बैठकीत ५ हजारांहून अधिक लोकांसाठी जेवण बनवण्याची क्षमता असलेल्या कम्युनिटी किचन आणि मनपाच्या आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र असेल अशा संस्थेला किंवा एनजीओला हे कंत्राट देण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला होता. (Khichdi Scam)
(हेही वाचा – Devendra Fadnavis : गुंतवणूकदारांची फसवणूक रोखण्यासाठी राज्यात ‘क्विक रिस्पॉन्स सिस्टीम’; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा)
दरम्यान मनपाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त (नियोजन) यांनी कदम यांच्या अर्जावर आधारित वैष्णवी किचन/सह्याद्री रिफ्रेशमेंट्स यांना खिचडी बनवण्याचे कंत्राट दिले. करारानुसार, प्रत्येक पाकिटात ३०० ग्रॅम खिचडी असायला हवी होती, परंतु परप्रांतीय मजुरामध्ये वितरित करण्यात आलेल्या खिचडीच्या पाकिटांमध्ये केवळ १०० ते २०० ग्रॅम खिचडी होती. कदम यांनी स्वतः कंत्राट घेऊन ही खिचडी सर्व उप कंत्राटदाराकडून करून घेतली. मनपाने खिचडी बनवण्यासाठी सह्याद्री रिफ्रेशमेंटला ५.९३ कोटी रुपये दिले होते असे आर्थिक गुन्हे शाखेने दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सह्याद्री रिफ्रेशमेंटच्या बँक खात्यातून संदीप राऊत (Sandeep Raut) यांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात आले होते. (Khichdi Scam)
आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बँकेतील व्यवहारांची तपासणी केली असता, त्यांना संदीप राऊत (Sandeep Raut) यांच्या बँक खात्यात ८ लाख रुपये हस्तांतरित झाल्याचे आढळुन आले होते. या आर्थिक व्यवहाराबाबत अधिकाऱ्यांनी संदीप राऊत (Sandeep Raut) यांना विचारणा केली असता त्यांनी खिचडी बनवण्यासाठी त्यांची ३०० चौरस फूट जागा भाड्याने दिली होती, ही रक्कम त्या जागेचे भाडे म्हणून घेतल्याचा दावा संदीप राऊत (Sandeep Raut) आर्थिक गुन्हे शाखेला नुकत्याच दिलेल्या जबाबात केला आहे. मात्र संदीप राऊत (Sandeep Raut) यांनी केलेला दावा हा तपास अधिकारी यांना असमाधानकारक वाटत आहे, कारण मुंबईतील ३०० चौरस फूट जागेचे तीन ते चार महिन्यांचे भाडे ८ लाख रुपये असू शकत नाही असे आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी यांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार संदीप राऊत (Sandeep Raut) यांनी या संदर्भात कोणतेही करार पत्र किंवा संबंधित कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेला दिलेले नाही. (Khichdi Scam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community