मागील काही महिन्यांपासून राज्यातील ड्रग्ज प्रकरणावर (Khopoli Drugs Case) मोठ्या प्रमाणावर कारवाई होतांना दिसत आहे. अशातच विरोधकांनी देखील हा मुद्दा उचलून धरला असून महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ होत असल्याची टीका केली होती. अशातच आता पुन्हा एकदा खोपोलीजवळ तब्बल १०७ कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून तिघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
सविस्तर माहितीनुसार, खोपोली शहरामधील ढेकू गावातील ‘इंडिया इलेक्ट्रिक पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’वर पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई केली आहे. या कंपनीमध्ये अवैध्यरित्या ड्रग्ज निर्मितीचे काम सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रायगड व खोपोली पोलिसांनी मिळून या कंपनीवर धाड टाकली. (Khopoli Drugs Case)
(हेही वाचा – Mumbai Crime : मानखुर्दच्या अफसानाचा उच्च न्यायालयाच्या आवारात गोंधळ, पोलिसांवर हल्ला)
यावेळी पोलिसांच्या हाती तब्बल १०७ कोटी ३० लाख रुपयांचे एम. डी म्हणजेच मेफेड्रॉन (Khopoli Drugs Case) हे रसायन जप्त केले आणि या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. या तिघांमध्ये त्या कारखान्याचे व्यवस्थापक, सुपरवायझर आणि एका तज्ज्ञ कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Khopoli Drugs Case) यांनी एक पत्रकार परिषद घेऊन या घटनेची माहिती दिली. गेल्या तीन महिन्यांपासून रायगड पोलिसांकडून ड्रग्ज विरोधी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘इंडिया इलेक्ट्रिक पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’वर पोलिसांनी कारवाई केली, असे सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community