Kidnapping News : सासऱ्याने केले जावयाचे अपहरण, लग्नात केलेल्या खर्चाची मागणी

187
Kidnapping News : सासऱ्याने केले जावयाचे अपहरण, लग्नात केलेल्या खर्चाची मागणी

वसईत राहणाऱ्या सासऱ्याने मुंबईतील मानखुर्द येथील २४ वर्षीय जावयाचे अपहरण (Kidnapping) करून वसई येथे एका खोलीत डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अपहरण करण्यात आलेल्या जावयाला मारहाण करून सुटकेसाठी लग्नात झालेल्या खर्चाची मागणी करण्यात आली होती. शिवाजी नगर पोलिसांनी सासऱ्याच्या तावडीतून जावयाची सुटका करून सासऱ्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kidnapping News)

अक्रम हैदर अली कुरेशी (२४) असे सासऱ्याच्या तावडीतून सुटका करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे. गोवंडीतील शिवाजी नगर येथे कुटुंबियांसह राहणारा अक्रम हा रिक्षाचालक आहे. ५ जुलै २०२३ मध्ये अक्रम याचा विवाह वसई येथे राहणाऱ्या सकिना खातून (२०) हिच्यासोबत झाला होता. महिन्याभरापूर्वी अक्रम याचे सासरे फिरोज अन्सारी (४५) हे अचानक गोवंडी येथे आले जावई अक्रम याला काहीही न सांगता मुलीला माहेरी वसई येथे घेऊन गेले. व त्यांनी महिना उलटूनही मुलीला सासरी पाठवले नाही. (Kidnapping News)

(हेही वाचा – देश तोडण्याची धमकी देणाऱ्या Sharjeel Imam ला दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर)

२५ मे रोजी सायंकाळी रोजी अक्रम याचा मित्र जाफर शेख याचा अक्रमचा फोन आला व त्याने चहा पिण्यासाठी अक्रमला मानखुर्द साठे नगर येथे बोलावून घेतले, दरम्यान त्या ठिकाणी सासरे फिरोज अन्सारी आणि त्यांच्या सोबत इतर तिघे-चौघे आले व त्यांनी बळजबरीने अक्रमला एका मोटारीत बसवले त्याचे तोंड आणि डोळे कापडाने बांधून तेथून त्याला थेट वसई येथे घेऊन आले व एका खोलीत डांबून ठेवले. त्या ठिकाणी त्याला मारहाण केली, त्यानंतर सासऱ्याने अक्रमच्या आई आणि भावाला फोन करून लग्नात झालेला खर्च व लग्नात दिलेले सर्व साहित्य आणून द्या, नाहीतर अक्रमला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी सासरा फिरोज याने दिली. (Kidnapping News)

अक्रमच्या कुटुंबीयांनी तात्काळ शिवाजी नगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली, पोलिसांनी तात्काळ एक पथक वसई येथे रवाना केले व तेथून अक्रम याची सुटका करून सासरे फिरोज अन्सारी यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांना शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याविरुद्ध अपहरण, डांबून ठेवणे, मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. (Kidnapping News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.