Kidnapping Case : लालबागच्या राजाला नवस बोलता आला नाही म्हणून दीड महिन्याच्या मुलाचे अपहरण

120
Kidnapping Case : लालबागच्या राजाला नवस बोलता आला नाही म्हणून दीड महिन्याच्या मुलाचे अपहरण
Kidnapping Case : लालबागच्या राजाला नवस बोलता आला नाही म्हणून दीड महिन्याच्या मुलाचे अपहरण

‘लालबागच्या राजा’कडे मुलासाठी नवस करता आला नाही, म्हणून तीने मुलाच्या हव्यासापोटी दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना मालाड मालवणी परिसरात घडली. पोलिसांनी मात्र १२ तासांत अपहरणकर्त्या महिलेचा शोध घेऊन तीला अटक केली आहे. मालाड पश्चिम मालवणी परिसरातून ऐन विसर्जनाच्या दिवशी सायंकाळी एका दीड महिन्याच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते, २५ वयोगटातील एका महिलेने मुलाच्या ९ वर्षीय बहिणीला २०० रुपये देऊन दुकानात सामान आणण्यासाठी पाठवुन मुलासह पळून गेली होती.

मालवणी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी गुन्ह्याची गंभीरता ओळखून तात्काळ पोलीस पथक मुलाचा शोध घेण्यासाठी रवाना केले. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासावरून पोलीस पथकाने १२ तासांत मुलाची मालवणी राठोडी येथून सुटका करून २५ वर्षीय महिलेला याप्रकरणी अटक करण्यात आली. या महिलेकडे चौकशी करण्यात आली असता या महिलेला दोन मुली आहे, मात्र तीला मुलगा हवा होता, त्यासाठी तीने लालबागच्या राजाला नवस करायला जाऊया म्हणून पतीकडे हट्ट केला होता.

(हेही वाचा – OBC Reservation : ओबीसी आरक्षण प्रश्नावरून अजित पवार-छगन भुजबळ भिडले)

पतीने तीला आज जाऊ उद्या जाऊ असे बोलून तीला टाळले, त्यात गुरुवारी विसर्जन असल्यामुळे यावर्षी नवस करता येणार नाही, मुलांसाठी आणखी वर्षभर वाट बघावी लागेल म्हणून ती निराश झाली होती. या नैराश्यातून तीने अपहरणाचा डाव रचून मालवणी परिसरातून दीड महिन्याच्या मुलाचे अपहरण केले होते, मुलाच्या अपहरणामागे तीचा हेतू केवळ त्याचा सांभाळ करण्याचा होता असेही चौकशीत समोर आले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.