Khalistan : पाकिस्तानातच खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाडाची हत्या 

पंजवाड हा मलिक सरदार सिंग हे नाव वापरून लाहोरमध्ये राहत होता.

177
पाकिस्तानातच खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाडाची हत्या
पाकिस्तानातच खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाडाची हत्या

पाकिस्तानातील लाहोरमध्ये खलिस्तानी Khalistani दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड याची हत्या करण्यात आली. पंजवाड हा खलिस्तान कमांडो फोर्सचा म्होरक्या होता आणि त्याने पाकिस्तानातून दहशतवादी कारवाया सुरू ठेवल्या होत्या. १९९० मध्ये तो भारतातून पळून पाकिस्तानात लपला होता. लाहोरच्या जोहर शहरातील सनफ्लॉवर सोसायटीमध्ये अज्ञात दुचाकीस्वारांनी घुसून परमजीत सिंग पंजवाड याच्यावर गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

Khalistani पंजवाड हा मलिक सरदार सिंग हे नाव वापरून लाहोरमध्ये राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी, ६ मे रोजी सकाळी सहा वाजता हल्लेखोर दुचाकीवरून सोसायटीत घुसले होते. हल्लेखोरांनी परमजीतसिंग पंजवाड याच्यावर हल्ला करून घटनास्थळावरून पळ काढला. चंडीगढ बॉम्बब्लास्टचा मास्टरमाईंड ३० जून १९९९ रोजी पंजवाडने पासपोर्ट कार्यालयाजवळ बॉम्बस्फोट घडवला होता. यामध्ये चार जण जखमी झाले होते. तर अनेक गाड्यांचे नुकसान झाले होते. एका स्कूटरमध्ये बॉम्ब लपवून ठेवण्यात आला होता असे सांगण्यात आले होते. पोलिसांनी नंतर पानिपतमधून स्कूटरच्या मालकाला अटक करून चौकशी केली होती. परमजीत सिंग पंजवाड हा पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील झब्बल गावचा रहिवासी होता. तो पूर्वी पंजाबमधील सोहल येथील बँकेत काम करत होता. नंतर तो पंजाबमध्ये दहशतवाद्यांच्या संपर्कात आला आणि त्याने स्वतःची दहशतवादी संघटना खलिस्तान Khalistani कमांडो फोर्सची स्थापना केली. भारताच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने २०२० मध्ये दहशतवाद्यांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये परमजीत सिंग पंजवाडचे नाव होते. १९९० मध्ये भारतीय सुरक्षा दलांचा घाबरून त्याने पाकिस्तानात पळ ठोकला होता.

(हेही वाचा The Kerala Story : अमरावतीत कोणतेही विरोध, निदर्शने नाहीत, पोलिस बंदोबस्तात ‘द केरळ स्टोरी’ प्रदर्शित)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.