New India Co-operative Bank च्या ग्राहकांना किरीट सोमय्या यांनी दिला महत्त्वाचा संदेश

113
New India Co-operative Bank च्या ग्राहकांना किरीट सोमय्या यांनी दिला महत्त्वाचा संदेश

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) काल (13 फेब्रु. ) रात्री मुंबईस्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर (New India Co-operative Bank) नवीन कर्ज (Loan) वितरीत करण्यास आणि ठेवी काढण्यास सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. बँकेत अलीकडील काळात घडलेल्या काही घडामोडींमुळे ठेवीदारांच्या रक्षण करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. (New India Co-operative Bank) यावर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी व्हिडिओ शेअर करत ठेवीदारांना चिंता न करण्याचं आवाहन केलं. (New India Co-operative Bank)

किरीट सोमय्या म्हणाले, ‘न्यू इंडिया सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लागू केले आहेत. मी ठेवीदारांना विनंती करतो, की तुमच्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी विम्याअंतर्गत परत मिळतील. ज्यांची सेफ डिपॉझिट लॉकर आहेत, त्यांना आपलं सर्व सामान सुरक्षित परत नेण्याची संधी मिळेल. ज्यांच्यामुळे बँक बुडाली आहे, त्यांच्यावर कारवाई बडगा उगारणार.’ असं किरीट सोमय्या यांनी न्यू इंडिया सहकारी बँकेच्या ठेवीदारांना सांगितलं आहे. (New India Co-operative Bank)

बँकेबाहेर बहुतांश ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. बँक अधिकाऱ्यांनी ग्राहकांना टोकन दिली आहेत. ग्राहक टोकनचा वापर लॉकरमधील सामान काढण्यासाठी करु शकतात. बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम सुरक्षित असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. (New India Co-operative Bank)

दोन वर्षांपासून बँक तोट्यात
यानंतर शुक्रवारी (14 फेब्रु.) सकाळी बँकेच्या (New India Co-operative Bank) शाखेबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी जमल्याचे पाहायला मिळत आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर ग्राहकांनी त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी ही गर्दी केली आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक गेल्या दोन आर्थिक वर्षांत तोट्यात (Loss) आहे, मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला २२७.८ दशलक्ष रुपयांचा आणि २०२३ मध्ये ३०७.५ दशलक्ष रुपयांचा तोटा झाला आहे, असे बँकेचया वार्षिक अहवालात म्हटले आहे. याबाबत रॉयटर्स या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. (New India Co-operative Bank)

न्यू इंडिया सहकारी बँकेवरील निर्बंध कोणते? (New India Co-operative Bank)

१. चालू किंवा बचत खातेधारकांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत
२. बँकेला नव्याने कर्जाचे वाटप करता येणार नाही
३. जुन्या कर्जाला मुदतवाढही देता येणार नाही
४. बँकेला कुठलीही गुंतवणूक करता येणार नाही
५. ठेवी तारण ठेवून घेतलेलं कर्ज मात्र निल करता येईल
६. बँकेतील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित
७. निर्बंधाचा कालावधी १३ फेब्रुवारीपासून सहा महिने

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.