राज्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यात आता कोल्हापूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या करवीर तालुक्यातील उजळाईवाडी इथल्या पसरिचानगरमध्ये एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरात धक्कादायक घटना घडली आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरातील मोलकरणीच्या अल्पवयीन मुलाने रिव्हॉल्वर चोरून (Kolhapur revolver thief) हवेत आणि घराच्या भिंतीवर गोळ्या झाडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणाचीही कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पसरिचानगरमध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी महावीर भाऊ सकळे (Retired Police Officer Mahaveer Bhau Sakle) यांच्या घरातच हा प्रकार घडला आहे. (Kolhapur Firing Case)
पसरिचानगरमध्ये सेवानिवृत्त पोलिस अधिकारी महावीर भाऊ सकळे यांच्या घरी मोलकरीण नेहमीप्रमाणे कामाला येत होती. आईला घरकामाला मदत करण्यासाठी अल्पवयीन मुलगा कधी कधी तो जात होता. एकेदिवशी मोलकरीण आपल्या १३ वर्षांच्या मुलाला घेऊन आली. त्यावेळी अधिकाऱ्याची खोल साफ करताना अल्पवयीन मुलाला ड्रॉवर उघडा दिसला. त्याने ड्रॉवरमधील रिव्हॉल्व्हर उचलले. त्यानंतर त्याने घरातच समोरच्या भिंतीवर गोळ्या झाडल्या. मात्र, परिसरात आवाज जास्त असल्याने आणि स्पीकर चालू असल्याने गोळी झाडल्याचा आवाज आला नाही.
(हेही वाचा – National Games Shooting Championship : सिफ्त कौर सामरा, जोनाथन एंथोनीला सुवर्ण)
भरदिवसा 34 पेक्षा जास्त गोळ्या झाडल्या
दरम्यान, अल्पवयीन मुलगा मोकळ्या रस्त्यावर गेला अन् फटाके उडवतो त्याप्रमाणे हवेत गोळीबार केला. त्याला मजा येऊ लागल्यावर त्याने माळावर जाऊन हवेत गोळ्या चालवल्या. दिवसभर अनेक वेळा हवेत फायरिंग केल्याचे समोर आले आहे. मालकाला याची माहिती मिळाल्यावर ही धक्कादायक बाब समोर आली. एखाद्याला गोळी लागली असती, तर अनर्थ घडला असता. मात्र भरदिवसा घडलेला हा प्रकार कोणालाच कसा समजला नाही? याबाबत पोलिसही अचंबित झाले आहेत.
(हेही वाचा – Mumbai Local चे रुपडे ‘पालटणार’ रेल्वे मंत्र्यांनी दिली ‘ही’ माहिती)
यूट्यूबवरून बंदूक चालवणे शिकला
आपल्या मुलाने रिव्हॉल्व्हर चोरल्याचे मोलकरणीला माहीत नव्हते. दरम्यान, लहान वयात याचे ज्ञान त्याला कसे आले, याची चौकशी पोलिसांनी केली असता आपण बंदुक चालवण्याचे यूट्यूबवरून (YouTube) शिकल्याचे अल्पवयीन मुलाने सांगितले आहे. या घटनेनंतर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडून (Gokul Shirgaon Police Station) तपास सुरू आहे. तर संबंधित सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या पिस्तूलचा परवाना रद्दसाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community