Kolkata Doctor Case: महिला डॅाक्टरसोबत गँगरेप? वडिलांनी दिली धक्कादायक माहिती

366
Kolkata Doctor Case: महिला डॅाक्टरसोबत गँगरेप? वडिलांनी दिली धक्कादायक माहिती
Kolkata Doctor Case: महिला डॅाक्टरसोबत गँगरेप? वडिलांनी दिली धक्कादायक माहिती

कोलकाता महिला डॉक्टर प्रकरणाने (Kolkata Doctor Case) संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या प्रकरणात आरोपी संजय रॉयला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. पण आता या प्रकरणात पीडितेच्या वडिलांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्यांना आपल्या मुलीचा शव दाखवण्यात आला तेव्हा ते पाहून बेशुद्धच झाले होते.

तीन तास पोलिसांनी विनवणी केल्यानंतर …
पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, जेव्हा त्यांना आपल्या मुलीचा शव दाखवण्यात आला तेव्हा ते पाहून बेशुद्धच झाले. पोलिसांनी माझ्या मुलीचा मृतदेह पाहण्याची अनेकदा विनंती केली. पण एक बाप म्हणून त्यांना ते शक्य झालं नाही. तीन तास पोलिसांनी विनवणी केल्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह पाहिला. मृतदेहाची अशी अवस्था होती की, तो पाहताच क्षणी वडिलांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले. पुढे त्यांनी सांगितलं की, तिचा मृतदेह पूर्णपणे रक्ताने माखला होता. आणि त्याची अवस्था देखील दयनीय होती. तिचे दोन्ही पाय 90 डिग्रीवर फाकवण्यात आले होती. तिच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. यावरुन स्पष्ट होते की, तिच्या कंबरे खालचा भाग निकामी झाला होता. हे दृश्य मी कधीच विसरु शकणार नाही. असं ते म्हणाले. (Kolkata Doctor Case)

अत्याचारात अनेक आरोपींचा समावेश
पीडितेच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, मृत डॉक्टराच्या प्रायव्हेट पार्टमध्ये 150 ग्रॅम वीर्य सापडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे वीर्य कुणा एका व्यक्तीचे नसल्याची शंका डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. पीडितेसोबत एका व्यक्तीने नाही तर गँगरेप झाल्याच म्हटलं जातं आहे. डॉक्टर सुवर्ण गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित डॉक्टरच्या प्रायव्हेट पार्टमध्ये 151 ग्रॅम शुक्राणू सापडले आहेत. एका व्यक्तीच्या शुक्राणूंची मात्रा इतक्या प्रमाणात होऊ शकत नाही. त्यामुळे अत्याचारात अनेक आरोपींचा समावेश असण्याची शक्यता असल्याचं डॉ. सुवर्ण गोस्वामी यांनी म्हटलं आहे. डॉक्टर गोस्वामी या ऑल इंडिया फेडरेशन ऑफ गव्हरमेंट डॉक्टर्स असोसिएशनच्या अतिरिक्त महासचिव सुद्धा आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे हा रेप नसून गँगरेप असल्याचं स्पष्ट होतंय. मृत महिलेच्या कुटुंबियांनी देखील या घटनेत एकापेक्षा अनेक आरोपींचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे. (Kolkata Doctor Case)

तिला MD होऊन गोल्ड मेडल जिंकायचं होतं
वडिलांनी सांगितलं की, त्यांच्या मुलीचं स्वप्न होतं की, तिला MD होऊन गोल्ड मेडल जिंकायचं होतं. तिने तिच्या खासगी वहीमध्ये याची नोंद केली होती. एवढंच नव्हे तर आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती खूप मेहनतही घेत होती. कुटुंबाने देखील तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. या घटनेने पीडित तरुणीचे आणि तिच्या कुटुंबाच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरले आहेत. (Kolkata Doctor Case)

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.