ऑगस्ट २०२४ मध्ये कोलकाताच्या आर. जी. कर महाविद्यालयातील (RG Kar rape case) ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी (Kolkata Doctor Murder Case) सियालदह सत्र न्यायालयाने आज मुख्य आरोपी संजय रॉयला (Sanjay Roy) दोषी ठरविले आहे. सोमवारी (२० जानेवारी) संजय रॉयला काय शिक्षा मिळते, याची घोषणा केली जाईल. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिर्बन दास यांनी हे प्रकरण सुनावणीस घेतल्यानंतर ५७ दिवसांनी निर्णय सुनावला आहे. यावेळी दास यांनी संजय रॉयला दोषी ठरविताना सांगितले की, तुला शिक्षा मिळायलाच हवी. (Kolkata Doctor Murder Case)
शवविच्छेदन अहवालात आरोपीने आधी पीडितेवर बलात्कार केला आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले होते. तिच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी आरोपीने तिचा दोनदा गळा दाबून तिचा जीव घेतला होता. सुरुवातीला आरजी कर मेडिकल कॉलेजने ही आत्महत्या असल्याचे सांगितले होते, पण नंतर हे प्रकरण समोर आल्यानंतर देश हादरला. (Kolkata Doctor Murder Case)
हेही वाचा-Cyber Fraud: आता ‘या’ सरकारी app वर करा मोबाइलच्या माध्यमातून तक्रार
सुनावणी झाल्यानंतर न्यायाधीशांनी सांगितले की, आम्ही सर्व पुरावे आणि साक्षीदार तपासले आहेत. तसेच वकिलांचा युक्तिवादही ऐकला. या सर्वांच्या आधारे आरोपी दोषी असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहीजे. (Kolkata Doctor Murder Case)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community