कोलकाता (Kolkata Doctor Rape And Murder Case) येथील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरवरील बलात्कार आण हत्याप्रकरणी सीबीआयच्या (CBI ) वेग आला आहे. माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर पॉलिग्राफ चाचणी करण्यास सीबीआयला स्थानिक न्यायालयाने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी संजय रॉय याला सीबीआयने शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ केली.
(हेही वाचा –Byculla Crime : भायखळा येथील खळबळजनक घटना! घरात घुसलेल्या माथेफिरुने ट्युशनसाठी आलेल्या मुलांना ठेवले वेठीस आणि…)
ही डॉक्टर ज्या कक्षात विश्रांती घेत होती त्याच्या दरवाजाची कडी तुटली असल्याचे सीबीआयला आढळले असून त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. या तरुणीचा आक्रोश कक्षाबाहेर कोणालाही कसा ऐकू गेला नाही आणि बलात्काऱ्यांना अडथळा निर्माण होऊ नये यासाठी या दरवाजाबाहेर कोणाला उभे करण्यात आले होते का, हे सीसीटीव्ही फूटेजद्वारे तपासले जात आहे, अशी माहिती सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली. (Kolkata Doctor Rape And Murder Case)
(हेही वाचा –kolkata Rape & Murder Case: ममतांनी PM मोदींना लिहिलेल्या पत्रावरून राजकीय युद्ध: भाजपाने केले ‘हे’ आरोप)
या दरवाजाची कडी आधीपासून तुटली होती व त्यामुळे दरवाजा आतून बंद होत नव्हता, अशी माहिती काही प्रशिक्षणार्थी डॉक्टर, कनिष्ठ डॉक्टर व वरिष्ठ डॉक्टरांनी चौकशीदरम्यान दिली आहे. यामुळे ही प्रशिक्षणार्थी डॉक्टर त्या रात्री दरवाजा आतून बंद करू शकली नव्हती, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. (Kolkata Doctor Rape And Murder Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community