पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामधील (Kolkata Doctor Rape Murder) आर. जी. कर वैद्याकीय महाविद्यालय (R. G. Kar Medical College) आणि रुग्णालयातील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने (Kolkata High Court) मंगळवारी दिले आहेत. उच्च न्यायालयाने सरकारी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना चांगलंच फटकारलं आहे. ते या घटनेनंतर सक्रीय नव्हते, हे निराशाजनक आहे, असं कोर्टानं स्पष्ट केलं. माजी प्राचार्यांनी राजीनामा दिल्यानंतर काही तासांमध्येच त्यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये तेच काम देण्यात आलं त्यावरही कोर्टानं नाराजी व्यक्त केली. त्यांना तातडीनं कर्तव्यावरुन दूर केलं जावं आणि सुट्टीवर पाठवावं असे आदेश कोर्टाने दिले. (Kolkata Doctor Rape Murder)
(हेही वाचा –“देशवासियांकडून मला न्याय हवा आहे”, बांगलादेश सोडल्यानंतर Sheikh Hasina यांचे पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य)
घटनेच्या पाच दिवसांनंतरही कोलकाता पोलिसांना तपासामध्ये लक्षणीय प्रगती करता आलेली नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच, लगेचच खुनाचा गुन्हा का नोंदवला नाही अशी विचारणाही राज्य सरकारकडे केली. त्यावर याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून २५पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, असे राज्य सरकारच्या वकिलांनी सांगितले. कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. टी एस शिवज्ञानम यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने राज्यातील निदर्शक डॉक्टरांना कामबंद आंदोलन मागे घेण्याचे निर्देशही दिले. (Kolkata Doctor Rape Murder)
(हेही वाचा –Fishermen : अंतराळ संशोधन क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा लाभ आता मच्छिमारांना होणार)
उच्च न्यायालयाने शहर पोलिसांना या प्रकरणाच्या तपासाची डायरी मंगळवार संध्याकाळपर्यंत आणि अन्य कागदपत्रे बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी एका स्वयंसेवकाला अटक करण्यात आली असून त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी सुरुवातीलाच खुनाचा गुन्हा दाखल का केला नाही? पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद का केली? डॉक्टरचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला सापडला नव्हता. रुग्णालयाचे अधीक्षक किंवा प्राचार्यांना तक्रार दाखल करता आली असती. असं मुख्य न्यायाधीश न्या. टी एस शिवज्ञानम यांनी म्हटलं आहे. (Kolkata Doctor Rape Murder)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community