kolkata rape case आरोपी संजयने दिली गुन्ह्याची कबुली; म्हणाला, “घटनेपूर्वी रेड लाइट एरियात…”

229
kolkata rape case आरोपी संजयने दिली गुन्ह्याची कबुली; म्हणाला,
kolkata rape case आरोपी संजयने दिली गुन्ह्याची कबुली; म्हणाला, "घटनेपूर्वी रेड लाइट एरियात..."

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात (kolkata rape case ) मुख्य आरोपी संजय रॉय (Sanjay Roy) याची रविवारी पॉलिग्राफी चाचणी करण्यात आली. तुरुंग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीबीआयच्या चार अधिकाऱ्यांनी ही चाचणी घेतली असून या चाचणीत संजय रॉय याने सर्व न पटणारी उत्तरे दिल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचा –Mumbai-Goa Highway गणेशोत्सवापूर्वी खड्डे मुक्त होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिल्या सूचना)

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, संजयने सीबीआयला पॉलीग्राफ चाचणी (Polygraph test) दरम्यान सांगितले की, त्याने 8 ऑगस्ट रोजी एका मित्रासोबत मद्यपान केले होते. यानंतर ते रेड लाईट एरियात गेले. वाटेत त्याने एका मुलीचा विनयभंग केला. यानंतर संजयने रात्री उशिरा त्याच्या मैत्रिणीशी व्हिडिओ कॉलवर बोलून नग्न छायाचित्रे मागितली. पहाटे चारच्या सुमारास संजय हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये पोहोचला, तिथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्यानंतर तो सकाळी त्याच्या मित्राच्या घरी गेला. संजयने सांगितले की, त्याचा मित्र कोलकाता पोलिसांत अधिकारी होता.

(हेही वाचा –शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना; Kangana Ranaut यांनी केली पोलखोल)

रॉयने दावा केला की, तो दारूच्या नशेत होता. त्याने चुकून पीडितेला सेमिनार हॉलमध्ये पाहिलं. त्याने हेल्मेटने दरवाजा उघडला तेव्हा त्याने पाहिलं की ती आधीच मृत झाली होती. त्यामुळे तो घाबरून पळाला. सीबीआयच्या सूत्रांनी म्हटलं. जर तो निर्दोष असेल तर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न का केला? पोलिसांना का कळवलं नाही? बलात्कार आणि हत्येप्रकरणी त्याच्याविरुद्ध इतके फॉरेन्सिक पुरावे का आहेत? असेही प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. दरम्यान, पुढील काही दिवसांत चार कनिष्ठ डॉक्टर आणि एका नागरी स्वयंसेवकाचीही अशाच पद्धतीने चाचणी करण्यात येणार आहे. रविवारी आणखी दोन डॉक्टरांची चाचणी होणार होती, परंतु ती पुढे ढकलण्यात आली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.