कोलकाता (kolkata rape case) येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणावरून पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) आंदोलने सुरू आहेत. मंगळवारी दुपारी हावडा येथील हावडा मैदान (Howrah Ground) परिसरातील जीटी रोडवर पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. हे आंदोलक राज्य सचिवालयाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत होते. या वेळी पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार, पाण्याचे फवारे, अश्रुधुराचा वापरही करावा लागला. यामुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण होते.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी
या घटनेत हावडा पोलीस आयुक्तालयातील चंडीतला पोलीस ठाण्याचे प्रभारी कर्मचारी जखमी झाले आहेत. विद्यार्थी संघटना ‘पश्चिम बंगा छात्र समाज’ आणि फुटीर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची संघटना ‘संग्रामी जौथा मंच’ यांनी मंगळवारी ‘नबन्ना अभिजन’ रॅलीला विविध ठिकाणांहून सुरुवात केली. महिला डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलक सचिवालय ‘नबान्न अभिजन’मध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. (kolkata rape case)
यावेळी एमजी रोड, हेस्टिंग्ज रोड आणि प्रिन्सेप घाटाजवळील संत्रागाछी आणि हावडा मैदानाजवळील भागात पोलीस आणि आंदोलकांत चकमक झाली. यात काही आंदोलक तसेच पोलीस जखमी झाले. आंदोलकांनी राज्य सचिवालयाकडे जाणाऱ्या बॅरिकेड्स पाडण्याचा प्रयत्न केला. (kolkata rape case)
बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न
‘पोलिसांनी आम्हाला का मारहाण केली? आम्ही कोणताही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. मृत डॉक्टरला न्याय मिळावा या मागणीसाठी आम्ही शांततापूर्ण रॅली काढली होती, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.’ असे एका महिला आंदोलक म्हणाल्या. पोलिसांनी सांगितले, की आंदोलकांनी सचिवालय गाठण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्लाही केला. (kolkata rape case)
पाण्याचे फवारे आणि अश्रुधुराचा वापर
त्यामुळे हावडा पुलाच्या कोलकाता बाजूने आणि कोना एक्स्प्रेसवेवरील संतरागछी रेल्वे स्थानकाजवळ आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे आणि अश्रुधुराचा वापर केला. संत्रागाछी येथे आंदोलकांनी पोलिसांवर विटा फेकल्या यात अनेक अधिकारी जखमी झाले. आंदोलकांनीही पोलिसांच्या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा केला आहे. (kolkata rape case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community