पुण्यात कोयता गँगची दहशत थांबेना; झोपलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर केला हल्ला

Koyta gang attack on senior citizens in pune

पुण्यातील कोयता गँगची दिवसेंदिवस दहशत वाढताना दिसत आहे. पोलिसांनी मुसक्या आवळूनही कोयता गँगची दहशत काही थांबत नाहीये. दरम्यान आता कोयता गँगने दोन ठिकाणी हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यातील पहिल्या घटनेत कोयता गँगने थेट झोपलेल्या ज्येष्ठ नागरिकांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या घटनेत लग्नात नाचताना झालेल्या किरकोळ वादामुळे चार जणांनी तरुणावर हल्ला केला आहे. त्यामुळे अजूनच पुण्यात खळबळ माजली आहे. 

जुन्या भांडणाच्या रागातून कोयता गँगचा हल्ला

माहितीनुसार, जुन्या भांडणाचा वचपा घेण्यासाठी सोमवारी रात्री कोयता गँगमधील तरुणांनी ज्येष्ठ पती-पत्नीवर कोयत्याने खुनी हल्ला केला. यावेळी हे ज्येष्ठ पती-पत्नी शिवाजीनगर जवळील मैदानावर मुलाबाळासह झोपले होते. काही महिन्यापूर्वी तक्रारदार सतीश काळेंचे काही तरुणांसोबत किरकोळ कारणासाठी बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीचा राग मनात धरून चार तरुणांनी सोमवारी रात्री कोयत्याने हल्ला केला. यामध्ये दाद्या बगाडे, दीपू शर्मा, तुषार काकडे आणि मोन्या कुचेकर यांचा समावेश होता. या चौघांवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपींचा शोध घेतला जात आहे.

लग्नात नाचताना झालेल्या वादामुळे तरुणावर हल्ला

पुण्यातील हडपसर परिसरात चार जणांनी तरुणावर कोयत्याने हल्ला केला. लग्नामध्ये नाचताना झालेल्या किरकोळ वादामुळे कोयता गँगने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. यावेळी तरुणाला मारहाण करण्यासाठी कोयता, हॉकी स्टिक आणि बांबूचा वापर करण्यात आला होता. ही घटना १५ जानेवारीला घडली असून १९ वर्षीय अमरदीप जाधवने मारहाण करण्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

(हेही वाचा – धक्कादायक! शाळेत स्नेहसंमेलन सुरू असताना शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग)

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here