-
प्रतिनिधी
भरधाव वेगात असलेल्या दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला असून दुचाकी चालक देखील अपघातात जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घाटकोपर पश्चिम एलबीएस रोड, गुरुनानक नगर येथे घडली. हस्तीमल जैन (६८) असे अपघातात मृत पावलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. हस्तीमल जैन हे कुर्ला पूर्व नेहरू नगर येथे राहणारे आहेत. जैन यांचे घाटकोपर पश्चिम आझाद नगर येथे गॅस शेगडी, रिपेअरिंग आणि सेल्सचे दुकान आहे. (Accident)
(हेही वाचा – CC Road : रस्त्यांचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी सिमेंट काँक्रिटीकरणाशिवाय पर्याय नाही)
मंगळवारी रात्री हस्तीमल जैन हे दुकान बंद करून घरी जाण्यासाठी निघाले असता एलबीएस रोड, गुरुनानक नगर येथे भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात हस्तीमल जैन आणि दुचाकी चालक हे दोघे जखमी झाले. एका रिक्षा चालकाने दोघांना रिक्षातून उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात आणले, डॉक्टरांनी दोघांना उपचारासाठी दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हस्तीमल जैन यांचा मृत्यू झाला. (Accident)
(हेही वाचा – वक्फ कायदाविरोधातील मुसलमानांच्या आंदोलनावर Supreme Court ने व्यक्त केली चिंता; म्हणाले…)
दुचाकी चालक शहजाद खान याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शहजाद हा कुर्ला बैलबाजार येथे राहणारा असून धान्य पुरवठा करणाऱ्या ऑनलाईन कंपनीकडे डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्याने स्कुटर चालक शहजाद खान याच्या विरुद्ध भारतीय न्याय सहींता कलम १०६ (निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत) आणि मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला औपचारिकरीत्या अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community