आईच्या मांडीवर झोपलेल्या ३ महिन्याच्या मुलीला पित्याने जमीनीवर आपटून ठार केल्याची घटना शनिवार १५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री कुर्ला पश्चिम येथे घडली आहे. पतीपत्नी मध्ये झालेल्या वादातून हे कृत्य केल्याचे समोर आले असून विनोबा भावे नगर पोलिसांनी (Vinoba Bhave Nagar Police Station) हत्येचा गुन्हा दाखल करून खुनी पित्याला अटक केली आहे. (Kurla Murder Case)
आफिया फातिमा परवेज सिद्दीकी असे दुर्दैवी चिमुरडीचे नाव आहे. या गुन्ह्यातील तक्रारदार सबा परवेज सिद्दीकी (२८) ही मयत मुलीची आई आहे. सबा ही पती परवेज सिद्दीकी (Parvez Siddiqui) पाच वर्षांची दानिया फातिमा दुसरी २ वर्षाची अमिना फातिमा आणि तिसरी ३ महिन्याची आफिया फातिमा अशा तीन मुली आणि सासू आणि दिर यांच्यासह कुर्ला पश्चिम एलआयजी कॉलनी (Kurla West LIC Colony) येथे राहण्यास आहे. पती परवेज हा कुठलाही कामधंदा करीत नसल्यामुळे पती पत्नीत सतत वाद होत होते.
(हेही वाचा – Shivsena आमदारांच्या सुरक्षेत आता केवळ एकच सुरक्षारक्षक असणार; आमदारांमध्ये नाराजी)
शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास परवेज आणि त्याची पत्नी सबा (२६) हे बेडरूम मध्ये होते, सबा ३ महिन्याची मुलगी आफियाला मांडीवर घेऊन झोपवत असताना परवेज आणि सबा यांच्यात कामधंद्यावरून वाद सुरू झाला, या वादात परवेजने पत्नी सबाला मारहाण करून पत्नीच्या मांडीवर असलेल्या ३ महिन्याच्या आफियाला परवेजने उचलून जमिनीवर जोरात आपटले, आणि घराबाहेर निघून गेला. यात गंभीर जखमी झालेल्या आफियाला सबा आणि कुटूंबियानी तात्काळ भाभा रुग्णालय (Bhabha Hospital) येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून तीला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच विनोबा भावे नगर पोलीसानी रुग्णालयात धाव घेऊन सबा हिचा जबाब नोंदवून परवेज विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून रविवारी त्याला अटक करण्यात आली आहे.
हेही पाहा –