बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानीला (bollywood actor Aftab Shivdasani) दीड लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा (kyc update online froud) घालण्यात आला आहे. या प्रकरणी शिवदासानीने वांद्रे पोलिस ठाण्यात (bandra police station)दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. केवायसी अपडेट (kyc update online froud) करण्याच्या नावाखाली शिवदासानी याची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे.
अभिनेता शिवदासानी याला ८ ऑक्टोबर रोजी, त्याचे खाते असलेल्या अॅक्सिस बँकेत (Axis Bank ) खाते काही काळासाठी बंद करण्यात येत आहे, तुम्ही तात्काळ केवायसी अपडेट करा (KYC Update online froud) या मेसेजसोबत एक लिंक पाठवण्यात आली होती अभिनेता शिवदासानी याने अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक केले. लिंकवर क्लिक केल्यानंतर काही वेळातच त्याला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला की तो बँकेचा अधिकारी आहे. त्या व्यक्तीने आफताबला त्याच्या खात्याशी संबंधित संवेदनशील माहिती टाकण्यासाठी मार्गदर्शन केले, त्यानंतर त्याच्या खात्यातून १,४९,९९९ रुपये डेबिट झाले.
(हेही वाचा-Share Market : शेअर बाजारात पुन्हा तेजी; सेन्सेक्स ३३२ अंकांनी वधारला)
काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच आफताबने सोमवारी बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधला. मॅनेजरने त्याला डेबिट झालेल्या पैशांबाबत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आफताबने वांद्रे पोलीस ठाणे गाठले, सोमवारी त्याने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वांद्रे पोलिसांनी भादवी कलम ४१९ आणि ४२० तसेच माहिती तंत्रज्ञान ( IT act) कायद्याच्या कलम ६६ (सी) आणि ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community