Ladki Bahin Yojana Scam: ३० आधारकार्डचा गैरवापर करून लाटले लाडक्या बहि‍णींचे पैसे; साताऱ्यातील धक्कादायक प्रकार उघड

173
Ladki Bahin Yojana Scam: ३० आधारकार्डचा गैरवापर करून लाटले लाडक्या बहि‍णींचे पैसे; साताऱ्यातील धक्कादायक प्रकार उघड
Ladki Bahin Yojana Scam: ३० आधारकार्डचा गैरवापर करून लाटले लाडक्या बहि‍णींचे पैसे; साताऱ्यातील धक्कादायक प्रकार उघड

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत (Mukhyamnatri Ladki Bahin Yojna) मोठी फसवणूक उघडकीस आली आहे. सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने ३० लोकांचे आधार कार्ड क्रमांक वापरून ३० स्वतंत्र अर्ज दाखल केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर या ३० पैकी अर्जाचे खाते हे सहकारी बँकेत आहे. त्यांनी फसवणूक करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा २६ लाभयार्थ्यांनी  लाभ घेतला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पनवेल तहसील कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, या व्यक्तीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana Scam) लाभ घेण्यासाठी महिलांचा फोटोचा गैरवापर केल्याचे उघडकीस आले.   (Ladki Bahin Yojana Scam)

फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने महिलांना वेगवेगळे कपडे घालायला लावले. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या केसांच्या स्टाइल बनवल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचा गेटअप बदलून फोटो काढले. अशाच पद्धतीने २७ महिलांचे छायाचित्र काढले.  त्या व्यक्तीने वेगवेगळ्या महिलांची आधारकार्ड त्यांच्या छायाचित्रांसह जोडली आणि ती जमा केली. तसेच त्यांचे अर्ज सरकार तर्फे मंजूर ही करण्यात आले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभाची रक्कमही त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे.

(हेही वाचा – ST Bus Strike : एसटीचा संप सुरूच; बैठकीतील आवाहनांना प्रतिसाद नाही)

अशा प्रकारे प्रकरण उघडकीस आले

दरम्यान, खारघरच्या रहिवासी पूजा महामुनी (२७) या महिलेचा अर्ज स्वीकारला जात नव्हता. त्यामुळे तिने याबाबत पनवेल शहरातील माजी नगरसेवक नीलेश बाविस्कर यांना २८ ऑगस्ट रोजी सांगितलं. नीलेश बाविस्कर यांनी चौकशी केली असता पूजा महामुनी यांचा अर्ज आधीच स्वीकारला गेल्याचं स्पष्ट झालं. तसा त्यांच्या मोबाईलवर मेसेजही आला होता.

३० खात्यांवर एकच मोबाईल क्रमांक लिंक

माजी नगरसेवक नीलेश बाविस्कर (Former corporator Nilesh Baviskar) यांनी या प्ररकणाची चौकशी केल्यानंतर या अर्जात नमूद केलेला क्रमांक त्यांना मिळाला. या एकाच नंबरवर तब्बल ३० लाभार्थी लिंक असल्याचंही आढळलं. या बाबत पनवेल तहसील कार्यालयात तक्रार करून योग्य कारवाईची मागणी करण्यात आली आहे. परंतु, अद्यापही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 

दरम्यान, तुमचाही अर्ज वारंवार स्वीकारला जात नसेल किंवा दीर्घकाळ स्वीकारण्याच्या प्रतिक्षेत असेल तर तुम्हीही तत्काळ याबाबतची चौकशी करा. आधार कार्डचा गैरवापर करून अशा पद्धतीने सरकारी योजना लाटण्याचा हा प्रकार जुना असून इतर महिलांनीही याबाबत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(हेही वाचा – मंत्रालयातील कामकाज ई ऑफिसद्वारे होणार; CM Eknath Shinde यांची माहिती)

लाडकी बहीण योजनेसाठी मुदत वाढवली

तसंच, लाडकी बहीण योजनेसाठी आता ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज (Application for Ladki Bahin Yojana now till 30th September) करता येणार आहे. याबाबत राज्य शासनाने नवा जीआरच काढला आहे. अनेक महिला विविध कारणामुळे अर्ज करू शकल्या नसल्याने त्यांनी त्वरीत हे अर्ज भरावेत असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.