मुंबई हायकोर्टाचे माजी पोलीस आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता रद्द केली आहे. २००६च्या लाखनभैय्या चकमक प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. (Lakhan Bhaiya Encounter Case)
नोव्हेंबर २००६ च्या लाखनभैय्या चकमक प्रकरणात १२ आरोपींना ट्रायल कोर्टाने ठोठावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. ट्रायल कोर्टाने १३ अन्य आरोपींना दोषी ठरवले होते आणि प्रदीप शर्मांची निर्दोष मुक्तता केली होती, मात्र हायकोर्टाने प्रदीप शर्मांची निर्दोष मुक्तता रद्द केली असून पुराव्यांच्या आधारे त्यांना दोषी ठरवले आहे.
(हेही वाचा – Prakash Ambedkar : ठाकरे आणि पवार गटावरील विश्वास उडाला; प्रकाश आंबेडकरांची जाहीर नाराजी)
एकूण १३ आरोपींना उच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे. प्रदीप शर्मा हे अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातीलही आरोपी आहेत.
कोण आहे लखन भैय्या?
न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने ८ नोव्हेंबर २०२३ रोजी या प्रकरणात आपला निर्णय राखून ठेवला होता. वसईचा रहिवासी लखन भैय्या (३३), ज्याचे खरे नाव रामनारायण गुप्ता असून तो अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या टोळीचा गुंड मानला जातो. मुंबईतील वर्सोवा परिसरात त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या चकमकीचे नेतृत्व माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी केल्याचा आरोप आहे.
मुक्ततेविरोधात ३७ दिवस युक्तिवाद
२०१३ मध्ये सत्र न्यायालयाने या प्रकरणात १३ पोलीस कर्मचाऱ्यांसह २१ जणांना दोषी ठरवले होते, मात्र शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती. सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. राज्य सरकारने फिर्यादीसाठी विशेष वकील म्हणून वकील राजीव चव्हाण यांची नियुक्ती केली होती आणि त्यांनी प्रदीप शर्माच्या निर्दोष मुक्ततेविरोधात ३७ दिवस युक्तिवाद केला होता. गुप्ताचा भाऊ रामप्रसाद गुप्ता, जो वकील आहे, त्याने शर्माच्या निर्दोष मुक्ततेविरोधात याचिका दाखल केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community