Lalbaug Bus Accident: लालबागच्या अपघात प्रकरणी मद्यधुंद आरोपी दत्ता शिंदेला अटक 

392
Lalbaug Bus Accident: लालबागच्या अपघात प्रकरणी मद्यधुंद आरोपी दत्ता शिंदेला अटक 
Lalbaug Bus Accident: लालबागच्या अपघात प्रकरणी मद्यधुंद आरोपी दत्ता शिंदेला अटक 

लालबाग येथील गरम खाडा मैदानासमोरील प्रवेशद्वारावर रविवारी (१ सप्टेंबर) बस गर्दीमध्ये घुसून झालेल्या अपघातामध्ये नुपूर मणियार (Nupur Maniyar) (२७) या तरुणीचा मृत्यू झाला. प्राप्तिकर विभागात कारकून (Clerk in Income Tax Department) असलेली नुपूर गणेशोत्सव कालावधीत लालबागमध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत असते. लालबागचा राजा येथून स्वयंसेवकाचा बॅज घेऊन परतत असताना तिच्यावर काळाने घाला घातला. या अपघातासाठी जबाबदार असलेला मद्यपी प्रवासी दत्ता शिंदे (Datta Shinde) याला काळाचौकी पोलिसांनी अटक केली. (Lalbaug Bus Accident)

नेमकी घटना काय घडली? 

२८ वर्षीय नुपूर मणियारचा या भीषण अपघातात (Lalbaug Bus Accident) मृत्यू झाला. नुपूरच्या मृत्यूसाठी बेस्ट बसमधला मद्यधुंद प्रवासी कारण ठरला. बस अनियंत्रित होण्यासाठी हाच प्रवासी जबाबदार होता. बेस्टची ६६ (Bus No 66) क्रमांकाची बस बॅलार्ड पिअर या ठिकाणाहून राणी लक्ष्मीबाई चौक सायनच्या दिशेने जात होती. बस लालबागच्या गणेश टॉकिजजवळ आली त्यावेळी मद्यधुंद प्रवासी आणि चालक यांच्यात वाद झाला. वाद घालणाऱ्या प्रवाशाने बेस्ट बसचं स्टिअरिंग खेचलं. त्यामुळे चालकाचा बसवरचा ताबा सुटला आणि बसने ९ जणांना उडवलं. या घटनेत नुपूर मणियारने नाहक जीव गमावला. दत्ता शिंदेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Lalbaug Bus Accident)

(हेही वाचा – Fraud : ७ कोटींची मनी लॉन्ड्रिंग; नाशिकमध्ये CBI च्या नावाखाली १२ लाखांची फसवणूक)

विवाहाआधीच मृत्यूने गाठले

चिंचपोकळी येथील मुक्ताई बावला कंपाऊंडमध्ये आई आणि बहिणीसोबत राहत असलेली नुपूर होणाऱ्या नवऱ्यासह लालबाग परिसरात आली होती. स्वयंसेवकाचा बॅज घेऊन दुचाकीवरून परतत असताना बसने पाठीमागून धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. नुपूरचे लग्न ठरले होते आणि दिवाळीनंतर ती विवाहबद्ध होणार होती. मात्र, त्याआधीच तिला मृत्यूने गाठले. मनमिळाऊ असलेल्या नूपुरच्या अपघाती मृत्यूमुळे लालबाग, चिंचपोकळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Lalbaug Bus Accident)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.