काही दिवसांपूर्वी ड्रगमाफिया ललित पाटील (Lalit Patil Drug Case) याला ससुन रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपाबाबत पुणे पोलीस दलातील दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं होतं. या दोघांवर बडतर्फीचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी काढले होते.
त्यानंतर आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून (Lalit Patil Drug Case) ससून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कर्मचारी ललित पाटील याला अनेक गोष्टींची मदत करत होता.
(हेही वाचा – Unseasonal Rain : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’ – मुख्यमंत्री)
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई
अधिक माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने (Lalit Patil Drug Case) ललित पाटीलला रुग्णालयात सर्वतोपरी मदत करणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे. महेंद्र शेवते असे त्या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्याकडून या प्रकरणाची बरीच माहिती मिळेल असे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याची अटक ही ललित पाटील प्रकरणातील मोठी अटक मनाली जात आहे. महेंद्र शेवते हा ससून रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात कार्यरत होता.
ससुन रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात शिपाई म्हणून काम करणारा महेंद्र शेवते (Lalit Patil Drug Case) हा ड्रग माफिया ललित पाटीलच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल्यावर शेवतेला अटक करण्यात आली. शेवते हा जरी शिपाई म्हणून नियुक्त असला तरी, 16 नंबर वॉर्ड मधील कैदी आणि ससुनमधील वरिष्ठ अधिकारी यांच्यामधे तो दुवा म्हणून काम करत होता. 16 नंबर वॉर्डमधे तो सतत ये जा करत होता. 16 नंबर वॉर्डमधे काम करणाऱ्या 10 ते 12 नर्सेसकडे चौकशी केल्यानंतर महेंद्र शेवतेला पोलिसांकडून अटक करण्यात आली. (Lalit Patil Drug Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community