ससून रुग्णालयातून पळून गेलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला पुणे पोलिसांकडून जंगजंग पछाडण्यात येत असून देखील त्यांच्या हाती न लागलेला ललित पाटील हा मुंबई पोलिसांना बंगळुरू येथे मिळून आला. साकीनाका पोलिसांना ३०० कोटींच्या ड्रग्स प्रकरणात पाहिजे असलेला आरोपी ललित पाटील याला अखेर मुंबई पोलिसांनीच अटक केली आहे. नाशिक ड्रग्स प्रकरणातील हा १५ वा आरोपी असून साकीनाका पोलिसांनी या पूर्वी १४ जणांना अटक केली होती. ललित पाटील याला अटक करून बुधवारी अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २३ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त (कावसु) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Lalit Patil)
मागील आठवड्यात मुंबईतील साकीनाका पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुंबईसह नाशिक आणि परिसरातून ३०० कोटींचा एमडी (mephedrone) हा अमली पदार्थ जप्त केला होता. या प्रकरणात साकीनाका पोलिसांनी १४ जणांना अटक केली होती. साकीनाका पोलिसांच्या तपासात नाशिक येथून एका फॅक्टरीतून जप्त करण्यात आलेल्या एमडीचे धागेदोरे ललित पाटील याच्याशी जुळत असून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील हा ड्रग्सची फॅक्टरी चालवत अशी माहिती साकीनाका पोलिसांच्या हाती लागली होती. (Lalit Patil)
परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपासासाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती. साकीनाका ड्रग्स प्रकरणाशी संबंधित आरोपी ललित पाटील हा बंगळुरू येथे एका हॉटेलमध्ये दडून बसला असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली. ललित पाटील यांच्या अटकेसाठी ३ पोलीस पथके बंगळुरू येथे रवाना करून मंगळवारी या पथकाने ललित पाटील याला ताब्यात घेऊन लागलीच मुंबई गाठली. बुधवारी ललित पाटील याला ३०० कोटींच्या एमडी प्रकरणात अटक करण्यात आली. या प्रकरणातील ललित हा १५ वा आरोपी असून यापूर्वी १४ आरोपींना साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे. ललित पाटील याला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २३ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Lalit Patil)
(हेही वाचा – Windfall Tax Cut : पेट्रोलियम क्रूडवरील विंडफॉल करात कपात )
ललित पाटील हा सर्वात मोठा ड्रग्स माफिया असून त्याचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांसोबत संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. ललित पाटील याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ऑक्टोबर २०२० मध्ये मोठ्या प्रमाणात मेफेड्रोनमध्ये सहभाग असल्या प्रकरणी अटक केली होती. अटकेनंतर त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र, हर्निया आणि क्षयरोगासह आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांना जूनमध्ये पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ३० सप्टेंबर रोजी नुकत्याच झालेल्या घडामोडीत, पुण्यातील अधिकाऱ्यांनी ललित पाटीलचा साथीदार, सुभाष मंडल, हॉस्पिटल परिसराजवळून सुमारे १.७१ किलोग्रॅम वजनाच्या मेफेड्रोनच्या महत्त्वपूर्ण रकमेसह अटक केली. (Lalit Patil)
ज्याची किंमत अंदाजे २.१४ कोटी रुपये आहे. ललित पाटील याने रुग्णालयातील एका कॅन्टीन कर्मचाऱ्यांच्या मदतीने मंडल याला अमली पदार्थ पुरवल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. २ ऑक्टोबर रोजी क्ष-किरण तपासणीसाठी घेऊन गेले असतानाही पाटील रुग्णालयातून पळून जाण्यात यशस्वी झाला. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला की त्याला पळवून लावला यावरून राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. अनेकांनी रुग्णालय प्रशासन, गृहविभागावर ताशेरे ओढले असून ललित पाटीलला पळवून लावण्यामागे राजकीय शक्ती असल्याचा आरोप लावण्यात येत आहे. (Lalit Patil)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community