Lalit Patil : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात महत्वाचा आरोपी अटकेत, पाटीलसह चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात साकीनाका पोलिसांनी नाशिक येथून आणखी एकाला गुरुवारी रात्री अटक केली आहे.

202
Lalit Patil : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात महत्वाचा आरोपी अटकेत, पाटीलसह चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ
Lalit Patil : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात महत्वाचा आरोपी अटकेत, पाटीलसह चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात साकीनाका पोलिसांनी नाशिक येथून आणखी एकाला गुरुवारी रात्री अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा या गुन्ह्यातील महत्वाचा दुवा असून त्यानेच पाटील बंधूंना ड्रग्जचा कारखाना उभा करण्यासाठी मदत केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. ललित पाटील, सचिन वाघ आणि गुरुवारी अटक करण्यात आलेले इतर दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. (Lalit Patil)

न्यायालयाने चौघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. साकीनाका पोलिसांनी ३०० कोटी ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या १८ झाली आहे. हरीश पंत आणि अमीर अतिक शेख असे गुरुवारी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून हरीश पंत याला नाशिक तर अमीर शेखला कुर्ला येथून अटक करण्यात आली आहे. दरम्यान साकीनाका पोलिसांनी १२ किलो एमडी जप्त केला आहे. (Lalit Patil)

नाशिक येथून अटक करण्यात आलेला हरीश पंत हा या गुन्ह्यातील महत्वाचा आरोपी असून त्याच्या मदतीने ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील याने ड्रग्सचा कारखाना नाशिक येथील शिंदे गावात उभा केला होता अशी माहिती समोर आली आहे. शुक्रवारी ललित पाटील आणि सचिन वाघ यांची पोलीस कोठडी संपली. या दोघांना आणि गुरुवारी अटक करण्यात आलेल्या अमीर आणि हरीश पंत अशा चौघांना अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले होते. (Lalit Patil)

(हेही वाचा – P V Sindhu Injury Update : सिंधूची गुडघ्याची दुखापत किती गंभीर?)

हरीश पंत हा या गुन्ह्यातील महत्वाचा धागा असून त्याच्या मदतीने पाटील बंधू यांनी ड्रग्जचा कारखाना नाशिकमध्ये उभा केला असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. तसेच नाशिक येथे लपविण्यात आलेले १२ किलो एमडी सचिन वाघ याच्याकडून जप्त करण्यात आले असून या प्रकरणात आणखी एमडी हा ड्रग्ज लपविण्यात आल्याची शक्यता असून ते शोधायचे आहे त्यासाठी ललित पाटील, हरीश पंत आणि आमिर अतिक शेख आणि सचिन वाघ यांना पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली. (Lalit Patil)

दरम्यान, ललित पाटील यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादात ललित पाटील यांच्याकडे काहीही सापडले नाही. त्याच्यानंतर अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे ड्रग्ज जप्त केले जात आहे, त्यामुळे पाटील यांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे पाटील यांच्या वकिलांनी न्यायालयात म्हटले आहे. न्यायालयाने दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर ललित पाटील सह चारही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करून सोमवार पर्यंंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Lalit Patil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.