Latur Drugs Case : लातूरमध्ये १७ कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) बाळगल्याच्या आरोपाखाली सात जणांना अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच डीआरआय (DRI action) मुंबईने त्यांच्या प्रादेशिक युनिट्ससह बुधवारी लातूरमध्ये एका गुप्त जागी तयार करण्यात आलेल्या मेफेड्रोन कारखान्याचा पर्दाफाश केला. या छापेमारीत कच्चा माल आणि उपकरणांसह बेकायदेशीर मेफेड्रोन जप्त केला आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या सात आरोपींना बुधवारी ९ एप्रिल अटक करण्यात आली आहे. (Latur Drugs Case)
(हेही वाचा – चीन आणि पाकिस्तानसोबत मैत्री Bangladesh ला पडली महागात; भारताच्या निर्णयाचा आघात)
मुंबईतील एका ड्रग्ज प्रकरणात पुणे येथील पथक एका संशयिताच्या शोधात रोहिणा परिसरात गेले होते. या प्रकरणातील सात आरोपींपैकी एकाचे मूळ गाव चाकूर तालुक्यातील (Chakur Taluka) असल्याची माहिती यंत्रणेकडे होती. दरम्यान, शेतात एका शेडमध्ये ड्रग्जचा कच्चा माल आणून गुपचूपपणे तो मिक्स करून पुन्हा मुंबईकडे पोहोचविण्याचा इरादा असल्याचा अंदाज आहे. तिथे धाड टाकल्यानंतर ११ किलो कच्चा माल हाती लागला असून, सात जणांना अटक केली आहे.
निसटण्याचा डाव फसला
ड्रग्ज प्रकरणाच्या (Drug cases) तपासासाठी चाकूर तालुक्यात पथक आले होते. कार (एमएच २४ एलबी १८९२) मध्ये बसून ते चाकूरहून लातूरकडे जाताना कारमधील आहाद अल्ताफखान ऊर्फ आहाद शफिक मेमन (रा. मुंबई) याने जाणीवपूर्वक कारचालकाच्या हातातील स्टेअरिंग उलटे फिरविले. कार उलटली. त्यात अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. मुंबईतील डोंगरी (Dongri police station) येथील आरोपीसोबतच चाकूर तालुक्यातील एक जण आणि अन्य सहाजण, अशा एकूण सात जणांची चौकशी सुरू आहे.
(हेही वाचा – शहरी नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी जनसुरक्षा विधेयक; CM Devendra Fadnavis यांची स्पष्टोक्ती )
चाकूर न्यायालयात केले हजर…
प्रमोद संजीव केंद्रे (वय ३५ रा. राेहिणा ता. चाकूर), महमद कलीम शेख (रा. गोळीबार रोड, मुंबई), जुबेर हसन मापकर (५२ रा. राेहा जि. रायगड), आहाद मेमन (रा. डाेंगरी, मुंबई), अहमद अस्लम खान (रा. मुंबई) यांना चाकूर न्यायालयात बुधवारी हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी मिळाली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community