Andheri मधून बिश्नोई गँगशी संबंधित ५ जणांना अटक; बड्या उद्योगपतीच्या हत्येचा कट गुन्हे शाखेने उधळला

87
Andheri मधून बिश्नोई गँगशी संबंधित ५ जणांना अटक; बड्या उद्योगपतीच्या हत्येचा कट गुन्हे शाखेने उधळला
Andheri मधून बिश्नोई गँगशी संबंधित ५ जणांना अटक; बड्या उद्योगपतीच्या हत्येचा कट गुन्हे शाखेने उधळला

मुंबईतील (Mumbai) गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या कथित बिश्नोई गँगशी (Bishnoi Gang) संबंधित ५ जणांना अंधेरीतून (Andheri) अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून ७ पिस्तुल आणि २१ राऊंड जप्त करण्यात आले आहेत. हे पाचही आरोपी २२ ते २७ वर्ष वयोगटातील आहेत. (Andheri) हे पाच जण मुंबईतील एका बड्या उद्योगपतीची हत्या करण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते, मात्र तत्पूर्वीच गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने या पाच ही जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

( हेही वाचा : Water : सर्वांसाठी पाणी योजनेमुळे महिलांचा पाण्यासाठीचा वेळ वाचला आणि आरोग्य; स्वच्छतेत सुधारणा!

विकास दिनेश ठाकूर उर्फ ​​विकी (२४) रा.हुमायूनपूर, गोरखपूर (उत्तर प्रदेश), सुमित कुमार दिलावर (२६)रा. सोनीपत (हरियाणा),देवेंद्र सक्सेना (२४) इंदोर (मध्य प्रदेश), श्रेयस यादव (२७) गोपालगंज (बिहार) आणि विवेक कुमार गुप्ता (२२) अलवर (राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. बॉलिवूड सलमान खान यांच्या घरावर झालेला गोळीबार आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर बिष्णोई टोळीची मुंबईत दहशत वाढलेली असताना मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या या पाच जणांच्या अटकेनंतर बॉलिवूड आणि उद्योगपतीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या वर्षी माजी राज्यमंत्री नबाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी या कुख्यात टोळीच्या २५ हून अधिक जणांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती. याव्यतिरिक्त, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबाराची घटना घडली होती, ज्यामुळे टोळीच्या कारवाया आणखी अधोरेखित झाल्या.२९ मार्च रोजी, गुप्तचर माहितीच्या आधारे, मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने (AEC) अंधेरी येथील प्लॅटिनम हॉटेलजवळ पाच जणांना अटक केली. अधिकाऱ्यांना संशय आहे की या व्यक्तींचे बिश्नोई टोळीशी संबंध असू शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपी कथित बिश्नोई गँगशी (Bishnoi Gang) संबंधित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात विकास ठाकूर (Vikas Thakur) उर्फ विक्की, सुमितकुमार दिलावर (Sumit Kumar Dilawar), श्रेयस यादव (Shreyas Yadav), देवेंद्र सक्सेना (Devendra Saxena) आणि विवेककुमार गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे. सुमितकुमार विरोधात अनेक गोळीबार आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंद तर विकास ठाकुर विरोधात देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली जात आहे. हे आरोपी हरियाणा, बिहार, राजस्थान येथील असल्याची माहिती आहे.

एका प्रख्यात उद्योगपतीला मारण्याचा कट फसला?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेले संशयित एका प्रसिद्ध उद्योगपतीची हत्या करण्यासाठी मुंबईत आले होते,मात्र पोलिसांनी या उद्योगपतीचे नाव उघड करण्यात नकार दिला आहे. कारवाईदरम्यान गुन्हे शाखेने सात देशी बनावटीचे पिस्तूल, २१ जिवंत काडतुसे आणि दोन सिम कार्ड जप्त केले. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी विकास ठाकूर याच्यावर उत्तर प्रदेशातील सेंधवा येथे बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. सुमित कुमारवर हरियाणामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यात खूनाचा प्रयत्न, हल्ला आणि गोळीबाराशी संबंधित गुन्हे समाविष्ट आहेत.

सलमान खानच्या धमक्यांशी काही संबंध असू शकतात का?

संशयितांनी ईदच्या गर्दीचा फायदा घेऊन एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीला लक्ष्य करण्याचा कट रचला होता का, याचा तपास पोलिस करत आहेत. ईदच्या दोन दिवसापूर्वी ही कारवाई करण्यात आली असल्याने, अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा त्यांच्या रडारवर आहे का, याचाही तपास अधिकारी करत आहेत. बिश्नोई टोळीशी त्यांचा किती संबंध आहे याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.