वरळी आदर्श नगर झोपू योजना खंडणी प्रकरणात राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप बांधकाम व्यवसायिक यांचे वकील निलेश पांडे यांनी मुंबई पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. बांधकाम व्यवसायिक आकाश गुप्ता यांना १० कोटींच्या खंडणीसाठी धमकी देणारे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकरसह ४ जणांना मीरा भायदंर येथील नवघर पोलिसांनी शनिवारी अटक केली. (Worli Adarsh Nagar)
या खंडणीच्या गुन्ह्यात स्वप्नील बांदेकर हा मोहरा असून त्याचा बोलवता धनी दुसराच असल्याचा आरोप बांधकाम व्यवसायिक गुप्ता यांचे वकील निलेश पांडे यांनी केला आहे.पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करावी अशी मागणी वरळीतील सागरदर्शन एस.आर.ए. गृहनिर्माण संस्थेचे समन्वयक गोविंद कामतेकर तसेच वकील निलेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत केली.मुंबई वरळीतील आदर्श नगर कोळीवाडा येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. सागरदर्शन एस.आर.ए. गृहनिर्माण संस्थेकडून हा प्रकल्प विकसित करण्यासाठी बांधकाम व्यवसायिक अशोक गुप्ता यांची नेमणूक करण्यात आली आहे. (Worli Adarsh Nagar)
(हेही वाचा- Delhi मध्ये कोणाची सत्ता येणार? दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी केला ५० जागा जिंकण्याचा दावा)
मागील काही महिन्यांपासून प्रकल्प बंद पाडण्यासाठी काही समाजकंटकांकडून वरळी आदर्श नगर येथील झोपू योजनेचा प्रकल्प बंद पाडण्याचा काही समाजसेवकाकडून सुरू असल्याचा आरोप ऍडव्हॉकेट निलेश पांडे यांनी केला आहे.
एस.आर.ए तसेच पोलीस आणि विविध एजन्सीना खोट्या तथ्यहीन तक्रारी करून बिल्डर आकाश गुप्ता यांच्या वर दबाव निर्माण करून या ठिकाणी सुरू असलेला प्रकल्प बंद पाडू अशी धमकी देऊन मागच्या आठवड्यात १० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी गुप्ता यांना फोन करण्यात येत होते.अखेर गुप्ता यांनी बनवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
(हेही वाचा- रविवारी मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेवर असणार Jumbo Mega block; कसं असेल वेळापत्रक? वाचा…)
नवघर पोलिसांनी माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर, हिमांशू शहा, किशोर काजरेकर आणि निखिल बोलार यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२), ३०८ (३) ३०८ (४), ३५२, ३५१(२) ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. बांधकाम व्यवसायिक अशोक गुप्ता यांचे वकील ऍड.निलेश पांडे आणि सागर दर्शन गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे या संदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत जवळपास वरळी आदर्श नगर येथील २०० ते २५० नागरिक तसेच सागर दर्शन गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी आणि सागरदर्शन एस.आर.ए. गृहनिर्माण संस्थेचे समन्वयक गोविंद कामतेकर तसेच वकील निलेश पांडे हे उपस्थित होते. आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वकील निलेश पांडे यांनी आरोप केला आहे की, नवघर पोलिसांनी अटक केलेले आरोपी हे केवळ मोहरे असून त्यांचा बोलवता धनी हा राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप सागरदर्शन एस.आर.ए. गृहनिर्माण संस्थेचे समन्वयक गोविंद कामतेकर यांनी केला आहे. पोलीसांच्या तपासात वरळीत राहणारे कृष्णा पेरुरकर यांचे नाव समोर आले असल्याची माहिती ऍड.पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे, या गुन्ह्यातील मास्टरमाइंड याचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणी ऍड. पांडे यांनी केली आहे. (Worli Adarsh Nagar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community