Lebanon Pager Blast: लेबनान पेजर स्फोटात भारतीय वंशाचा नागरिक चर्चेत! काय आहे कारण?

174
Lebanon Pager Blast: लेबनान पेजर स्फोटात भारतीय वंशाचा नागरिक चर्चेत! काय आहे कारण?
Lebanon Pager Blast: लेबनान पेजर स्फोटात भारतीय वंशाचा नागरिक चर्चेत! काय आहे कारण?

लेबनॉनमध्ये हजारो पेजरच्या स्फोटामुळे (Lebanon Pager Blast) अनेक लोक मरण पावले आणि शेकडो लोक जखमी झाले आहेत. लेबनानने या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचे सांगितले. मात्र इस्रायलने अद्याप याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. आता या प्रकरणात एका भारतीय नागरिकाचे नाव चर्चेत आले आहे. केरळच्या वायनाड येथे जन्मलेला आणि सध्या नॉर्वेत राहणार्‍या रिन्सन जोसचा (Rinson Jose) पेजर पुरवठा करण्यात हात असल्याची चर्चा आहे.

(हेही वाचा-Dharavi: धारावीत तणाव! मशीदचा अवैध भाग तोडण्यासाठी गेलेल्या बीएमसीच्या वाहनांवर हल्ला, अल्पसंख्याकांनी आधीच आखली होती हल्ल्याची योजना )

रिन्सन जोसच्या माध्यमातूनच हेझबोलाच्या अतिरेक्यांना पेजरचा पुरवठा झाला होता. गोल्ड अपोलो या कंपनीने तयार केलेल्या पेजरमध्ये इस्रायलच्या मोसाद या संघटनेने तीन ग्रॅम स्फोटके बसविली होती, असा आरोप होत आहे. गोल्ड अपोलो या कंपनीने स्फोटानंतर निवेदन देताना म्हटले की, पेजरच्या ज्या मॉडेलचा स्फोट झाला, ते हंगेरीमधील बुडापेस्ट स्थित असलेल्या बीएसी कन्सलंन्टीग केएफटी या कंपनीने बनविलेले होते. आमचा फक्त ट्रेडमार्क त्यासाठी वापरला होता. (Lebanon Pager Blast)

रिन्सन जोस चर्चेत कसा?

आयएनएस वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, जोस उच्चशिक्षणासाठी नॉर्वेमध्ये गेला होता. नॉर्वेत जाण्याआधी त्याने लंडन येथे काही काळ नोकरी केली होती. नॉर्वेतील डीएन मीडिया या कंपनीसाठी त्याने पाच वर्ष नोकरी करत असल्याचे त्याच्या लिंकडिन प्रोफाइलवरून समजते. जोस हा त्याच्या पत्नीसह ओस्लो येथे स्थायिक झालेला आहे. तर त्याचा जुळा भाऊ लंडन येथे काम करतो. जोसच्या नातेवाईकांनी सांगितले की, आमचे जोसशी दररोज फोनवरून बोलणे व्हायचे. मात्र पेजर स्फोटाची बातमी आल्यानंतर मागच्या तीन दिवसांपासून आमचे काहीच बोलणे झालेले नाही. त्याचा कोणत्याही चुकीच्या कामात काहीही संबंध नसेल, अशी आमची खात्री आहे. आम्हाला वाटते, त्याला या प्रकरणात फसवले गेले असावे. (Lebanon Pager Blast)

जोसने २२ एप्रिल रोजी नोर्टा ग्लोबल लिमिटेड कंपनीची स्थापना केली होती. ही कंपनी बल्गेरियाच्या सोफिया येथे स्थित आहे. मागच्या वर्षी युरोपियन संघाच्या बाहेर कन्सल्टिंग सेवा देऊन या कंपनीने एका वर्षात सहा कोटींचा नफा कमविला होता. याच कंपनीची आता बल्गेरियाच्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडून चौकशी होणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून शेकडो पेजर्स हेझबोलाला विकण्यात आल्याचे समोर आले आहे. (Lebanon Pager Blast)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.