Liquor Policy Scam Case : मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढ

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्ली न्यायालयाने २८ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे. विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी हा आदेश दिला आहे.

232
Liquor Policy Scam Case : मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढ

दिल्ली सरकारच्या दारू धोरण घोटाळ्यातील (Liquor Policy Scam Case) आरोपी खासदार संजय सिंह आणि माजी मंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता दोघांना २८ फेब्रुवारी \पर्यंत कोठडीत राहावे लागेल.

(हेही वाचा – Ajinkya Rahane : मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्यामुळे बाद, पण आसाम संघाने परत बोलावलं)

न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर शनिवार १७ फेब्रुवारी रोजी या दोघांना (Liquor Policy Scam Case) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आज आरोपींच्या वकिलाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली असल्याचे सांगितले. ते अद्याप पूर्ण झालेले नाही. सुनावणीदरम्यान, सर्वेश मिश्राच्या वकिलांनी सांगितले की ईडीने सर्वेश मिश्राला या प्रकरणात सरकारी साक्षीदार बनण्याची ऑफर दिली होती. आरोपींच्या वकिलांनी सांगितले की, संजय सिंह यांच्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर ईडीने नवीन कागदपत्रे जोडली. कायदा ईडीच्या म्हणण्यानुसार चालणार नाही, असे ते म्हणाले.

न्यायालयीन कोठडीत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढ –

३ फेब्रुवारी रोजी (Liquor Policy Scam Case) न्यायालयाने त्यांना आजपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. २० जानेवारी रोजी न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली होती. ३ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने सिंह यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी राज्यसभेत जाण्याची परवानगी दिली होती.

(हेही वाचा – Kamal Nath : काँग्रेसला अजून एक धक्का; कमलनाथ भाजपात प्रवेश करणार ?)

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज –

न्यायालयाने २४ जानेवारी रोजी या प्रकरणातील आरोपी सर्वेश मिश्रा याला नियमित जामीन मंजूर केला होता. ईडीने सिंह यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी चौकशी केल्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. (Liquor Policy Scam Case) सिंह यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. राऊज एव्हेन्यू न्यायालयाने २२ डिसेंबर २०२३ रोजी संजय सिंहचा जामीन अर्ज फेटाळला होता.

(हेही वाचा – Paytm Crisis : पेटीएम पेमेंट्स बँकेला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ)

४ ऑक्टोबर रोजी अटक –

ईडीने सिंह (Liquor Policy Scam Case) यांच्या अधिकृत निवासस्थानी चौकशी केल्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. ईडीने ९ मार्च २०२३ रोजी या प्रकरणात चौकशी केल्यानंतर मनीष सिसोदिया यांना तिहार तुरुंगातून अटक केली होती. सिसोदियाला यापूर्वी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सी. बी. आय. ने अटक केली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.