ED Raids : मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडीची ३२ ठिकाणी छापेमारी; झारखंडमध्ये मंत्र्याच्या मुलाच्या घरातून ३० लाखांची रोकड जप्त

189
ED Raids : मद्य घोटाळ्या प्रकरणी ईडीची ३२ ठिकाणी छापेमारी; झारखंडमध्ये मंत्र्याच्या मुलाच्या घरातून ३० लाखांची रोकड जप्त

झारखंडमधील दारू घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून (ED Raids) काल म्हणजेच बुधवार २३ ऑगस्ट रोजी मोठी कारवाई करण्यात आली. ईडीने कडून ३२ ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये झारखंडचे अर्थमंत्री रामेश्वर उराव, त्यांचा मुलगा रोहित उराव आणि दारू व्यवसायाशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. ईडीने झारखंड, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये छापे (ED Raids) टाकले. तसेच ईडीने छत्तीसगडमध्ये मनी लाँड्रिंग आणि बेटिंगमधील हवाला कनेक्शनप्रकरणी देखील छापे टाकले.

ईडीने (ED Raids) दारू घोटाळ्याप्रकरणी धनबाद, देवघर, दुमका, गिरिडीह, हजारीबाग, जामतारा व कोलकात्यासह रांचीमधील ३२ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. यात झारखंडचे अर्थमंत्री रामेश्वर उराव यांचा मुलगा रोहित, मद्यविक्रेते योगेंद्र तिवारी व त्यांच्या साथीदारांवर कारवाई झाली. सकाळी ६.३० वाजल्यापासून सुरू झालेल्या छाप्यात ईडीला मंत्री ओराव यांच्या घरातून ३० लाख रुपये मिळाले आहेत. ईडीला (ED Raids) विविध ठिकाणांहून अनेक महत्त्वाची कागदपत्रेही मिळाली आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार रोहितने योगेंद्र तिवारींच्या माध्यमातून या व्यवसायात मोठी रक्कम गुंतवली आहे.

(हेही वाचा – KEM Hospital : मधुमेहग्रस्तांसाठी खुशखबर! केईएम रुग्णालयात मिळणार मोफत इन्सुलिन)

छत्तीसगडमध्ये सट्टेबाज, मनी लाँड्रिंग, हवाला किंग टार्गेट

छत्तीसगडमध्ये सट्टेबाजी, मनी लाँड्रिंग आणि हवाला कनेक्शनशी संबंधित लोकांवर ईडीने (ED Raids) सलग तिसऱ्या दिवशी रायपूर आणि दुर्ग-भिलाई येथे छापे टाकले. मुख्यमंत्र्यांचे राजकीय सल्लागार विनोद वर्मा यांच्या देवेंद्रनगर येथील बंगल्यावर पथक पाेहोचले. तीन टीम ओएसडी आशिष वर्मा, मनीष बनचोर आणि व्यापारी विजय भाटिया यांच्या भिलाई येथील घरी पोहोचल्या. तिथे सर्वांचे फोन, लॅपटॉप, दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.