कुर्ला पश्चिमेतील (Kurla Bus Accident) एसजी बर्वे मार्गावरील अंजुमन इस्लाम हायस्कुल (Anjuman Islam High School) समोर सोमवारी (9 डिसेंबर) रात्री बेस्ट बसचे नियंत्रण सुटून भरधाव बसने पादचारी आणि वाहनांना चिरडत एका कमानीवर आदळली. या अपघातात सहा जण ठार तर ४९ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
कुर्ला ते अंधेरी या मार्ग क्रमांक ३३२ बसने वाहने आणि पादचाऱ्यांना चिरडत असताना कुर्ला पश्चिम (Kurla West) एस.जी. बर्वे मार्गावर एकच गोंधळ निर्माण होऊन लोक रस्त्यावर सैरावैरा धावत होते. बेस्ट बस चालक संजय मोरे याला रात्री कुर्ला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मंगळवारी दुपारी त्याला कुर्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (Kurla Bus Accident)
बेस्ट बस साठी कुर्ला स्थानक मार्ग मंगळवारी बंद ठेवण्यात आला असून कुर्ला स्थानकातून सुटणाऱ्या बेस्ट बसेस कुर्ला आगार आणि चेंबूर सांताक्रूझ लिंक रोड येथून सोडण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. मुंबई महानगरपालिका च्या म्हणण्यानुसार , बस जवळपास ३०० मीटरच्या पलीकडे ३० ते ४०वाहनांना आणि पादचाऱ्याना चिरडत शेवटी आंबेडकर नगर सोलोमन बिल्डिंगच्या आरसीसी कॉलमला धडक दिल्यानंतर थांबली. (Kurla Bus Accident)
अपघातातील मृत आणि जखमींची नावे
या अपघातात आत्तापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 49 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील मृतांची आणि जखमींची नावेही समोर आली असून मृतांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कनीस अन्सारी ( वय 55), आफरीन शाह ( वय 19), अनम शेख ( वय 20) , शिवम कश्यप ( वय 18), विजय गायकवाड ( वय 70), फारूख चौधरी ( वय 54) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यापैकी चौघे हे कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल होते, तर एक कोहिनूर रुग्णालयात आणि अन्य एक मृत व्यक्ती हबीब रुग्णालयात होती. (Kurla Bus Accident)
हेही वाचा-Kurla Bus Accident : बसचे ब्रेक फेल नाहीत; कुर्ला अपघात प्रकरणी पोलिसांचा दावा
तर बसच्या धडकेमुळे 40 जणांहून अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्यापैकी काही जणांवर भाभा रुग्णालय, सिटी हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, सेव्हन हिल्स रुग्णालय, हबीब रुग्णालय, सायन हॉस्पिटल, फौझिया रुग्णालय, कुर्ला नर्सिंग होम अशा विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे अशी माहिती समोर आली आहे. (Kurla Bus Accident)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community