Lok Sabha Election 2024 : पवईच्या जंगलातील छाप्यात हातभट्टीचे साहित्य जप्त

एकूण ३४७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आला असल्याचे भरारी पथक प्रमुख यांनी कळविले आहे.

196
Lok Sabha Election 2024 : पवईच्या जंगलातील छाप्यात हातभट्टीचे साहित्य जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या अनुषंगाने २९-मुंबई उत्तर मध्यचे खर्च निरीक्षक सुरजकुमार गुप्ता यांच्यासह अधिकाऱ्यांनी पवईच्या जंगलात हातभट्टी तयार करण्यात येत असलेल्या ठिकाणांवर छापा टाकून ३४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट केला. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्रमांक दोन, मुंबई उपनगर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये ही माहिती दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Alamgir Alam : झारखंडचे काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक)

एकूण ३४७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

खर्च निरीक्षक गुप्ता, समन्वय अधिकारी सतीश देवकाते, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अविनाश रणपिसे, भरारी पथक क्रमांक दोनचे निरीक्षक अनिल पवार यांच्यासह निरीक्षक बाळासाहेब नवले, प्रफुल्ल भोजने, सहाय्यक दुय्यम निरीक्षक राहुल राऊळ, स्वप्नाली पाटील, विशाल शितोळे, मनोज होलम, जवान प्रदीप अवचार, काठोळे, सावळे, खंडागळे, दळवी यांनी साई बांगोड गावालगत असलेल्या जंगल परिसरात असलेल्या हातभट्टी तयार करण्यात येत असलेल्या ठिकाणांवर छापे टाकून दोन गुन्हे नोंदविले. एकूण ३४७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आला असल्याचे भरारी पथक प्रमुख यांनी कळविले आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.