Love Jihad : विवाहासाठी मुसलमान तरुणाकडून हिंदू तरुणीला ब्लॅकमेल

उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये एका हिंदू मुलीला धमकावून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. कादिर अंसारी असे आरोपीचे नाव आहे. एका हिंदू मुलीला खूप वेळापासून त्रास देण्याचा आणि निकाहासाठी तिच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र लग्नासाठी तिने नकार दिल्यानंतर त्याने तिचे अपहरण करुन बेशुद्धीच्या अवस्थेत तिला कुंकू लावले. पोलिसांनी शनिवारी, २१ जानेवारी २०२३ रोजी FIR नोंदवून ह्या प्रकाराचा तपास सुरु केला.

सहा महिने आपला पाठलाग करत होता

ही घटना कोतवाली नगर क्षेत्रमधील राणीघाट गावातील आहे. पीडितेने तक्रारीमध्ये  म्हटले की, कादिर आपल्या शेजारी राहत होता, तो जवळपास सहा महिने आपला पाठलाग करत होता. त्याच्या सोबत लग्न करण्याचा दबाव निर्माण करत होता. त्याला नकार दिल्यावर कादिरने बदनाम करण्याची धमकी दिली आणि ब्लॅकमेल करू लागला. तपासा दरम्यान समजले की, लोकलज्जा आणि बदनामीच्या भितीने पीडितेने सर्व काही गुपचूप सहन केले. या दरम्यान तिच्या घरच्यांनी तिचे लग्न ठरवून दिले. जेव्हा ही माहिती कादिरला मिळाली तेव्हा त्याचा जळफळाट झाला आणि त्याने लग्न मोडण्याचे बरेच प्रयत्न केले.

(हेही वाचा मुंबईकरांना बसणार विजेचा झटका; १८ टक्के वीजदरवाढ

पीडितेला बेशुद्ध करून कुंकू लावले 

एकदा पीडित युवती रस्त्याने जात असताना कादिरने एका मादक पदार्थाच्या वासाने तिला बेशुद्ध केलेले व एका निर्जण जागेवर घेऊन गेला. पीडितेच्या म्हणण्यानुसार सुनसान जागेवर कादिरने तिच्या भांगेत कुंकू लावले आणि त्याचा व्हिडियो बनविला. हे सगळे घडत असताना ती मुलगी बेशुद्धच होती. नंतर कादिर ते व्हिडियो आणि फोटो वायरल करण्याची धमकी देऊ लागला. तो पीडितेवर लग्न मोडण्यासाठी दबाव निर्माण करू लागला, तिने नकार दिल्यावर त्याने तो व्हिडियो वायरल केला. पीडितेने कादिरला त्याच्याशी निकाह करण्यास नकार दिल्यावर त्याने जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवर पोलिसांनी कादिर अंसारीच्या विरूद्धात IPC कलम 328,354,506 आणि 509 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here