Love Jihad: उरणमध्ये तरूणीची निर्घृण हत्या! आरोपीच्या मुसक्या आवळल्या

613
Love Jihad: उरणमध्ये तरूणीची निर्घृण हत्या! आरोपीच्या मुसक्या आवळल्या
Love Jihad: उरणमध्ये तरूणीची निर्घृण हत्या! आरोपीच्या मुसक्या आवळल्या

रायगड जिल्ह्यातील उरण येथे २२ वर्षीय यशश्री शिंदे (Yashshree Shinde) हिच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा आणि छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह (Love Jihad) आढळला आहे. तिचा मृतदेह एनआय स्कूलजवळ सापडला. दरम्यान आरोपीला बंगलोर येथे पळून गेल्याचे समजताच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी अल्पसंख्यांक समाजातील असल्याने उरण येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

(हेही वाचा –शिळफाटा सामूहिक अत्याचार, हत्येच्या खटल्यात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी – CM Eknath Shinde)

यशश्री शिंदे दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तिच्या चेहरा, शरीर, आणि गुप्तांगावर गंभीर जखमा आढळल्या. ही बातमी उरण आणि नवी मुंबईत पसरल्यानंतर नागरिकांमध्ये मोठा रोष पसरला आहे. (Love Jihad)

(हेही वाचा –Pune News : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेचे पथक रवाना)

यशश्री आपल्या कुटुंबीयांसह उरण येथे राहत होती आणि बेलापूरमधील एका कंपनीत काम करत होती. गुरुवारी (२५ जुलै) सकाळी कामावर निघाल्यापासून ती बेपत्ता होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांना रेल्वे स्थानकाजवळील झुडपात तिचा मृतदेह आढळून आला. कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. यशश्रीच्या वडिलांनी दाऊद शेख नामक इसमावर हत्या केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनाही एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. (Love Jihad)

(हेही वाचा –Ganpati Special train: आरक्षणात घोळ की आणखी काही? पश्चिम रेल्वेच्या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण अवघ्या १ मिनिटात फुल्ल)

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, तरुणीच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या असून वैद्यकीय चाचणीनंतर बलात्कार झाल्याचे समोर आले तर तेही कलम जोडले जाईल. आरोपीचा शोध घेण्यासाठी सात पथके तयार करण्यात आली होती. (Love Jihad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.