राजधानी दिल्लीच्या जवळ असलेल्या गाझियाबादमध्ये लव्ह जिहादचे (Love Jihad) आणखी एक प्रकरण समोर आले आहे. एका मुस्लीम इसमाने ओळख लपवून हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिला गोमांस खाण्यास भाग पाडले. याप्रकरणी पिडीत तरुणीने स्थानिक विजय नगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खालिद चौधरी असे आरोपीचे (Love Jihad) नाव आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी 2 पथके तयार केली आहेत. गाझियाबाद पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडितेने सांगितले की, दीपक नावाच्या तरुणाने 2020 मध्ये तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. तिने रिक्वेस्ट स्वीकारली. पीडितेने पुढे सांगितले की, सुरुवातीला आरोपी तिला अधूनमधून मेसेज करत असे, तर तिने काही मेसेजला रिप्लाय दिल्यावर आरोपी तिच्याशी मेसेंजरवर चॅट करु लागला.तब्बल सहा महिन्यांनी त्यांची भेट झाली. भेटी वाढू लागल्यानंतर एके दिवशी तिला कळले की आरोपीचे नाव दीपक नसून खालिद चौधरी आहे.
(हेही वाचा – Artificial Intelligence : आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे घेणार मुलांमधील शिक्षणाचा कल)
पीडितेने पुढे सांगितले की, हे सत्य कळल्यानंतर ती आरोपीपासून दूर जाऊ लागली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आरोपीने आता तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. यादरम्यान आरोपीने (Love Jihad) तिच्यावर अनेकवेळा बलात्कारही केला. त्यामुळे ती गरोदर राहिली. त्यानंतरही आरोपी तिच्यावर बलात्कार करत होता. त्यामुळे तिच्या पोटात वाढणारे मूल आतमध्येच दगावले. त्यानंतर पीडितेने आरोपीवर लग्नासाठी अनेकदा दबाव टाकला, परंतु आरोपीने तिला आधी इस्लाम स्वीकारण्यास सांगितले आणि अनेकदा तिला निजामुद्दीन मशिदीत नेले. एवढेच नाही तर आरोपीने तिला एक दिवस वाढदिवसाच्या बहाण्याने बोलावून तिच्या कमरेवर ‘खालिद’ असे नाव गोंदवले. पीडितेने तिच्या तक्रारीत सांगितले की, आरोपी खालिद तिला नेहमी हिजाब (Love Jihad) घालून बाहेर जाण्यास भाग पाडत असे. एवढचे नाही तर गोमांसासह अनेक प्राण्यांचे मांस खायला द्यायचा. यानंतर आरोपीनी तिचे धर्मांतर करुन तिचे नावही बदलले.
पीडितेने सांगितले की, जेव्हा तिने नाव बदलण्यास विरोध केला तेव्हा आरोपीने सांगितले की, तो अशा प्रकारे हिंदू मुलींना (Love Jihad) प्रेमात अडकवतो. हे करण्यासाठी त्याला वरुन आदेश मिळतात. याबाबत गाझियाबादच्या पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीनंतर विजय नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपीच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community