नरसिम्मा रेड्डी दामोदर रेड्डी (५६, कोट्टीवक्कम, चेन्नई, तमिळनाडू) यांना राज्यपालपदाचे आमीष दाखवत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. संशयित निरंजन कुलकर्णी (४०, सेवन श्री अपार्टमेंट, मोटवानी रोड, नाशिक रोड) याला अटक करण्यात आली आहे. (Cyber Crime) भूलथापा देत निरंजन कुलकर्णी याने तमिळनाडूस्थित (Tamil Nadu) व्यक्तीकडे सेवा शुल्कापोटी १५ कोटींची मागणी करून सुमारे पाच कोटी नऊ लाख रुपये घेत फसवणूक केली.
(हेही वाचा – Delhi Schools Bomb Threat: दिल्लीतील ४० शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, केली ‘ही’ मागणी)
१५ कोटी रुपये सेवा शुल्काची मागणी
राजकीय नेतेमंडळींशी आपली ओळख असून कोणत्याही राज्याचे राज्यपालपद मिळवून देऊ शकतो, अशा भूलथापा दिल्या. तसेच सेवा शुल्कापोटी १५ कोटींची मागणी करून सुमारे पाच कोटी नऊ लाख रुपये घेत फसवणूक केली. संशयिताने रेड्डी यांना जानेवारीत शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये बोलावून घेतले होते. अनेक राजकीय मंडळींशी आपला परिचय असल्याचा दावा करुन कोणत्याही राज्याचे राज्यपालपद मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या कामासाठी १५ कोटी रुपये सेवा शुल्क द्यावे लागेल, असे सांगितले.
बनावट दस्तावेज दाखवून फसवणूक
कुलकर्णी याने रेड्डी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी हे काम करता न आल्यास आपल्या नावावरील जमिनीचे खरेदीखत रेड्डी यांच्या नावे करून देण्याची तयारी दाखवली. तसेच पेंच व्याघ्र प्रकल्प आणि बोर व्याघ्र प्रकल्पालगतची १०० एकर जमीन शासनाकडून करारावर घेतल्याचे बनावट दस्तावेज आणि नाशिकजवळील चांदशी येथील जागेचे बनावट दस्तावेज दाखवून रेड्डी यांचा विश्वास संपादित केला. रेड्डी या भूलथापांना बळी पडले. त्यांच्याकडून रोख स्वरुपात आणि त्यांचे नातेवाईक व संस्थेच्या खात्यावरून फेब्रुवारी ते एप्रिल २०२४ या कालावधीत पाच कोटी आठ लाख ९९ हजार ८७८ रुपये संशयिताने घेतले. नंतर संशयिताच्या कागदपत्रांची छाननी केली असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित निरंजन कुलकर्णीला अटक करुन रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने संशयितास १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (Cyber Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community