नेहमीच वर्दळीच्या असणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) म्हणजेच ‘टर्मिनल २’च्या वाहनतळावर ‘मर्सिडीज बेंज’ या आलिशान कारचा रविवारी (2 फेब्रु.) विचित्र अपघात (Mumbai Airport Accident) झाला. मर्सिडीज कारच्या (Mercedes car) धडकेत दोन परदेशी नागरिकांसह पाच जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांकडून चालकाला अटक करण्यात आली असून गाडी ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू आहे. (Mumbai Airport Accident)
पाच जखमींमध्ये दोन परदेशी नागरिकांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर विमानतळावरील तीन जखमी कर्मचाऱ्यांवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच या अपघातादरम्यान चालक दारू किंवा अंमली पदार्थांच्या नशेत नव्हता, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र कार चालकाने ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्याने अपघात झाल्याचे समजत आहे. (Mumbai Airport Accident)
नेमकं काय घडलं ?
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ‘टर्मिनल २’च्या परिसरात ‘मर्सिडीज बेंज’ या आलिशान कारचा अपघात झाला. यावेळी आरोपी कारचालकाने एकाला प्रवेशद्वार क्रमांक १ वर सोडले होते. त्यानंतर सदर व्यक्तीला सोडून परत जाताना त्याचा मर्सिडीज कारवरचा ताबा सुटला आणि ती कार प्रवेशद्वार क्रमांक ३ च्या समोरील उतारावर जाऊन आदळली. (Mumbai Airport Accident)
हेही वाचा-Haffkine Institute : हाफकीन संस्थेला नवसंजीवनी; आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती होणार
यानंतर विमानतळ वैद्यकीय पथकाने तातडीने प्राथमिक उपचार करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलिस आणि इतर यंत्रणेच्या माध्यमातून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले. (Mumbai Airport Accident)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community