महाकुंभ 2025 (Maha kumbh 2025) ची सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांतच महाकुंभाची सांगता होणार आहे. करोडो भाविकांनी महाकुंभाला उपस्थिती लावली आहे. काही भाविक आपल्या कुटुंबीयांसह आणि लहान मुलांसह महाकुंभाला (Maha kumbh 2025) आले आहेत, तर काही भाविक एकटेच येथे आपली उपस्थिती नोंदवत आहेत. अशातच उत्तर प्रदेशातील ७५ तुरुंगांमधील कैद्यांना विशेष पद्धतीने महाकुंभमेळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. (Maha kumbh 2025)
हेही वाचा-Matka Gambling : ‘हिंदुस्थान पोस्ट’चा दणका; कुर्ल्यातील मटका जुगारावर पोलिसांची कारवाई
उत्तर प्रदेश (UP) तुरुंग प्रशासन प्रयागराजच्या संगमातून पवित्र पाणी आणून सर्व तुरुंगांमध्ये कैद्यांच्या स्नानाची व्यवस्था करत आहे. उत्तर प्रदेशचे तुरुंग मंत्री दारा सिंह चौहान (Dara Singh Chauhan) यांच्या कार्यालयाच्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० ते १० या वेळेत सर्व तुरुंगांमध्ये हा विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. राज्यभरातील तुरुंगांमध्ये एकूण ९० हजारांहून अधिक कैदी आहेत, ज्यामध्ये सात मध्यवर्ती कारागृहांचाही समावेश आहे. (Maha kumbh 2025)
हेही वाचा-महापालिका आयुक्त गगराणी पोहोचले Dadar Cemetery मध्ये; सुविधा पाहून अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश
कारागृह महासंचालक पी.व्ही. रामशास्त्री (P.V. Ramshastri) म्हणाले की, “ही विशेष व्यवस्था तुरुंग मंत्र्यांच्या देखरेखीखाली केली जात आहे. संगमामधून आणलेले पवित्र पाणी तुरुंगातील लहान पाण्याच्या टाक्यांमध्ये भरले जाईल आणि नंतर ते कैद्यांच्या आंघोळीसाठी वापरले जाईल. २१ फेब्रुवारी रोजी लखनौ तुरुंगात होणाऱ्या कार्यक्रमात तुरुंग मंत्री दारा सिंह चौहान आणि वरिष्ठ तुरुंग अधिकारी उपस्थित राहणार आहेत. (Maha kumbh 2025)
हेही वाचा-आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री बनणाऱ्या Rekha Gupta आहेत तरी कोण ?
यापूर्वी १७ फेब्रुवारी रोजी उन्नाव तुरुंगात कैद्यांसाठी अशाच प्रकारे स्नान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उन्नाव तुरुंगाचे अधीक्षक पंकज कुमार सिंह म्हणाले की, “याचा बऱ्याच काळापासून विचार केला जात होता आणि आता २१ फेब्रुवारी रोजी कैद्यांना पुन्हा पवित्र संगमातील पाण्याने स्नान करण्याची संधी मिळणार आहे.” (Maha kumbh 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community