Mahad drugs case : रायगडच्या महाड येथील एमआयडीसीमध्ये अंमली पदार्थ बनवणाऱ्या छोट्या कारखान्यावर एनसीबीने (NCB) कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन जणांना NCB ने अटक केली असून या कारवाईत NCB ने 46.8 किलोचं मॅफेड्रोन (Mephedrone) जप्त केले आहे. संबंधित प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे. (Mahad drugs case)
मिळालेल्या माहितीनुसा, रायगडमध्ये अंमली पदार्थ बनवणाऱ्या एका छोट्या कारखान्यावर एमसीबीने कारवाई केली आहे. रायगडच्या महाड येथील एमआयडीसीमध्ये (Mahad MIDC) हा कारखाना सुरु करण्यात आला होता. या प्रकरणात दोन जणांना एनसीबीकडून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 46.8 किलोचं मॅफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. बाजारात या ड्रग्जची किंमत अंदाजे 50 कोटी इतकी आहे. या प्रकरणी NCB ने रायगडमधून ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यातील साहित्य जप्त केले आहे.
(हेही वाचा – Nagpur Violence चे बांगलादेशी कनेक्शन? घुसखोर बांगलादेशी नागरिकाला अटक)
दरम्यान, भांडुपमधील (Bhandup) एका अंमली पदार्थाची तस्करी (Drug trafficking) करणाऱ्या व्यक्तीवर एनसीबीने कारवाई केल्यानंतर या कारखान्याची माहिती समोर आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास एनसीबी करत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community