Mahadev App Case : महादेव अ‍ॅप प्रकरण- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बॉलिवूड सेलिब्रिटी बनणार साक्षीदार 

कार्यक्रमात सहभागी झालेल्या सेलिब्रिटींना लवकरच समन्स बजावण्यात येणार आहे

263
Mahadev App Case : महादेव अ‍ॅप प्रकरण- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बॉलिवूड सेलिब्रिटी बनणार साक्षीदार 
Mahadev App Case : महादेव अ‍ॅप प्रकरण- मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बॉलिवूड सेलिब्रिटी बनणार साक्षीदार 
मुंबई –
महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप (Mahadev App Case) प्रकरणात ईडीकडून बॉलिवूड अभिनेत्यासह दोन कॉमेडियन यांच्या मॅनेजर यांच्या मुंबई आणि दिल्लीतील घरी छापे टाकण्यात आले आहे. या छापेमारीत ईडीने अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. महादेव बेटिंग अ‍ॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्रकार यांच्या विवाह सोहळ्यास दुबईत उपस्थित असणाऱ्या सेलिब्रिटी यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्षीदार करण्यात येणार असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सेलिब्रिटी मॅनेजर महादेव अ‍ॅपचे (Mahadev App Case) प्रवर्तक सौरभ चंद्राकर यांच्या दुबईमध्ये फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी गेले होते. या सेलिब्रिटी मॅनेजर्सना इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून हवाला मार्फत रोख रक्कमा देण्यात आलेल्या असून त्यातील १०टक्के कमिशन सेलिब्रेटी व्यवस्थापकांना मिळाल्याचे तपासात समोर आले आहे. या व्यतिरिक्त, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने सेलिब्रिटींच्या राहण्याची व्यवस्था, विमानाचा खर्च आणि इतर सुविधांची व्यवस्था केली होती.
चंद्राकर हा डी-कंपनीचा जवळचा सहकारी आहे आणि महादेव अ‍ॅप (Mahadev App Case) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात फरार आरोपी आहे. फेब्रुवारी २०२३  मध्ये, चंद्राकरने दुबईमध्ये एका भव्य विवाह कार्यक्रमाचे आयोजन केले होते, जिथे त्याने जवळपास २०० कोटी रोख खर्च केले होते, या पैशांचा कुठलाही हिशोब नसल्याचे तपासात समोर आले आहे.  या विवाह सोहळ्यात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आणि त्यांनी या सोहळ्यात परफॉर्म केले. मोबदल्यात त्यांना हवाला मार्फत रोखीने पेमेंट करण्यात आले होते, ही रोख रक्कम कथितपणे हवाला मार्फत इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे पाठवली गेली, ज्यांनी  या लग्नाच्या कार्यक्रमासाठी या सेलिब्रिटींना नियुक्त केले होते.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सेलिब्रिटींना लवकरच समन्स बजावण्यात येणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ते या सेलिब्रिटींचे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवतील. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी पुढील आठवड्यात दोन कॉमेडियन्सना त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी बोलावण्याची शक्यता आहे. या दोन अभिनेते-कॉमेडियनना चंद्राकरच्या लग्नाच्या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने २० लाखांहून अधिक रोख दिले होते, असे तपास यंत्रणेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
असा आरोप आहे की केवळ या दोन विनोदी कलाकारांना लाखो रुपये रोख मिळाले नाहीत तर काही बॉलीवूड ए-लिस्टर सेलिब्रिटींनीही कोट्यवधींची रोकड घेतल्याचा आरोप आहे. टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, नुसरत भरुचा, पुलकित सम्राट, कृष्णा अभिषेक, विशाल ददलानी, आतिफ अस्लम, राहत फतेह अली खान, अली अजगर, एली अवराम, भाग्यश्री आणि कीर्ती खरबंदा, भारती सिंग आणि सुनील ग्रोअर या सेलिब्रिटींनी यांनी मोठ्या रकमा घेऊन या विवाह सोहळ्यात उपस्थित होऊन परफॉर्मन्स केले होते.
काही दिवसांपूर्वी ईडीने मॅरेज इव्हेंट प्लॅनिंग कंपनी, आर-१ इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर काही लिंक्ड इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर छापा टाकला ज्यांना हवाला चॅनेलद्वारे ११२  कोटी मिळाले होते. या व्यतिरिक्त, युनायटेड अरब अमिराती दिरहाम वापरून ४२ कोटी रुपयांच्या हॉटेल बुकिंगसाठी रोख रक्कम दिली गेली. ईडीने आर-१ इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड चे मालक, योगेश पोपट, मिथिलेश आणि इतर संबंधित आयोजकांच्या कार्यालयाची झडती घेतली होती, यावेळी जवळपास अडीच कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली  होती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.