महादेव बेटिंग ॲप प्रकरणी काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक, षडयंत्र संबंधित विविध कलमांसह भ्रष्टाचार नियंत्रण कायद्यातील कलमे एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. बघेल आणि ॲपच्या प्रमुखासह एकूण २१ जणांचा यामध्ये समावेश आहे. लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजून अवघा एक दिवस होतो न होतो तेच हे प्रकरण समोर आले आहे. (Mahadev Betting App)
(हेही वाचा – Narendra Modi: लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच मोदींना परदेशातून पाठिंबा, ‘या’ देशात काढण्यात आली भव्य रॅली)
ॲपच्या मालकांकडून ५०८ कोटी रुपये घेतल्याचा आरोप
बघेल यांच्याविरोधात ४ मार्च रोजीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती आता समोर आली आहे. बघेल यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हे छत्तीसगड (Chhattisgarh) आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आले असून यामध्ये भादंविच्या १२० ब, ३४, ४०६, ४२०, ४६७, ४६८ आणि ४७१ या कलमांचा समावेश आहे. मात्र महादेव ऑनलाईन सट्टेबाजी ॲप प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचालनालयाकडूनही (ईडी) केला जात आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीची टांगती तलवारही बघेल यांच्यावर असणार आहे.
अधिक माहिती अशी की, बघेल यांनी मुख्यमंत्री असताना संयुक्त अरब अमिरातीमध्ये असलेल्या ॲपच्या मालकांकडून ५०८ कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या महादेव ॲपचा मालक तुरूंगात आहे. त्याला मनी लाँर्डिंगच्या गुन्ह्यात (Money laundering Offences) अटक करण्यात आली आहे.
काय आहे महादेव ॲप प्रकरण?
महादेव बेटिंग ॲप ऑनलाईन सट्टेबाजीसाठी बनवण्यात आले होते. त्यावर पोकर, कार्ड गेम्स असे लाईव्ह गेम्स खेळता येत होते. त्याचप्रमाणे क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल असे खेळ आणि निवडणुकांमध्ये सट्टेबाजीही केली जात होती. या ॲपमध्ये उघडण्यात आलेली खाती सर्वाधिक छत्तीसगडमधील होती. या ॲपमध्ये पैसे टाकणाऱ्या ग्राहकांपैकी केवळ ३० टक्केच ग्राहक जिंकतील, अशी सेटिंग त्यामध्ये करण्यात आली होती. त्यामुळे मालकांना मोठा फायदा होत होता. अवैध पध्दतीने चालणाऱ्या या ॲपमध्ये अनेकांची नावे समोर आली आहेत. (Mahadev Betting App)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community